सोलापूर जिल्ह्यात खरीप नुकसानीपोटी १३० कोटींचे वाटप

खरीप नुकसानीपोटी १३० कोटींचे वाटप
खरीप नुकसानीपोटी १३० कोटींचे वाटप

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली आहे. खरीप हंगामातील पीक नुकसानीपोटी आतापर्यंत तीन लाख ४३ हजार ३०५ शेतकऱ्यांच्या खात्यावर १३० कोटी ९१ लाख ८९ हजार रुपये जमा झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली. 

शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान देण्यासाठी शासनाकडून जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांना ३२९ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा झाला आहे. त्या निधीचे वितरण प्रशासनाने सुरू केले आहे.

जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांतील ९५२ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानंतर उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्‍यातील दोन मंडलांचा अपवाद वगळता उर्वरित गावांमध्येही दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, या दोन तालुक्‍यांसाठीचा निधी अद्यापही प्रशासनाकडे आला नाही. त्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील ९५२ गावांपैकी ७७७ गावांतील शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या आहेत. ७७७ गावांतील चार लाख ७८० शेतकऱ्यांच्या याद्या तयार झाल्या आहेत. त्यापैकी तीन लाख ४३ हजार ३०५ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर प्रत्यक्षात पैसे जमा झाले आहेत. 

तालुकानिहाय अनुदान वाटप, शेतकरी संख्या  

दक्षिण सोलापूर आठ कोटी १२ लाख ४०३७५
अक्कलकोट २७ कोटी ८२ लाख ६२ हजार ३०७
माढा १० कोटी ४८ लाख ४४ हजार ८६१
करमाळा  १६ कोटी २७ लाख ४५ हजार ४९३
पंढरपूर  २० कोटी १४ लाख ५५ हजार ६१२
मोहोळ सहा कोटी ५२ लाख १७ हजार ८३९
मंगळवेढा १४ कोटी ३३ लाख ४२ हजार ८१४
सांगोला २१ कोटी ८१ लाख २४ हजार ६१४
माळशिरस  पाच कोटी ३९ लाख नऊ हजार ३९०
एकूण १३० कोटी ९१ लाख 3 कोटी ४३ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com