agriculture news in marathi 130 quintal green chilli arrival in aurangabad APMC | Agrowon

औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३० क्विंटल आवक

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 एप्रिल 2020

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.४) हिरव्या मिरचीची १३० क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.४) हिरव्या मिरचीची १३० क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांच्या थेट शेतमाल विक्रीसह इतर जिल्ह्यातून व राज्यातून येणारी शेतमालाची आवक मंदावल्याचे शनिवारी औरंगाबाद बाजार समितीमध्ये आलेल्या फळे व भाजीपाल्याच्या आवकेवरून स्पष्ट झाले. औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याची ४८० क्‍विंटल आवक झाली. या कांद्याला ६०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. १५ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवर चे दर ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. टोमॅटोची आवक ५५ क्विंटल तर ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १० क्विंटल आवक झालेल्या काकडीला ५०० ते ८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. भेंडीची आवक १३ क्विंटल तर दर ८०० ते १००० रुपये प्रति क्विंटल राहिला. ३० क्विंटल आवक झालेल्या शेवग्याला ५०० ते ८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. पपईची आवक १२ क्विंटल तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिला.

मक्याची आवक २० क्विंटल तर दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. २१ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला पाचशे ते १८०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. २९ क्विंटल आवक झालेल्या कैरीचे दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. संत्राची आवक १८ क्विंटल तर दर ६०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३० क्विंटल आवक झालेल्या टरबुजाला ५०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. खरबुजाची आवक २२ क्विंटल तर दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३०० क्विंटल आवक झालेल्या बटाट्याला ८०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. द्राक्षाची आवक ५३ क्विंटल तर दर २००० ते ३००० रुपये प्रति क्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली. 


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये...सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर सांगली  ः...
औरंगाबादमध्ये मका ९२५ ते ११५५ रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये भुसारच्या आवकेत अजूनही घट नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
पुणे बाजार समिती मुख्य आवार रविवारपासून...पुणे : गुलटेकडी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट...
खानदेशात धान्य लिलाव बंदच जळगाव : खानदेशात अनेक बाजार समित्यांमध्ये धान्य...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १००० ते १३०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
मका खरेदीसाठी संदेश पाठवूनही खरेदी...औरंगाबाद : जिल्ह्यात सुरू झालेल्या ८ हमी...
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(...नाशिक : बागायती भागातून वाढलेला पुरवठा आणि...
कोल्हापुरात फळांची आवक घटलेलीचकोल्हापूर : बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू...
खानदेशात मका, गव्हाच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात मका व गव्हाच्या दरात सुधारणा होत...
पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने...सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सुरू...
खानदेशात कडब्याचे दर दबावात जळगाव  ः खानदेशात ज्वारी, मका, बाजरीच्या...
राहुरीत कांदा लिलाव सुरु, पण आवक, दर...राहुरी, जि. नगर : लॉकडाउनमुळे तब्बल दोन...
खानदेशात शिवार खरेदीत मक्याला १३००...जळगाव : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात मक्‍याची...