सातारा जिल्ह्यात नव्याने १३३ ई-सेवा केंद्रांना मान्यता 

सातारा जिल्ह्यात नव्याने १३३ ई-सेवा केंद्रांना मान्यता 
सातारा जिल्ह्यात नव्याने १३३ ई-सेवा केंद्रांना मान्यता 

सातारा : शासकीय, प्रशासकीय सुविधा गावागावांत पोचविण्यासाठी शासन ‘आपले सरकार सेवा केंद्र’द्वारे गावागावापर्यंत निघाले आहे. जिल्ह्यात सध्या ७४८ ‘आपले सरकार’ केंद्र असून, अजूनही मोठ्या गावांत केंद्रे सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. 

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या सेतू, महा ई-सेवा केंद्र व संग्राम केंद्रांना आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ११ सेतू सेवा केंद्रे, १५७ महा ई-सेवा केंद्र व ग्रामपंचायत स्तरावरील ४८३ संग्राम केंद्रांचे आपले सरकार सेवा केंद्रात परिवर्तन केले आहे. १९ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार नव्याने अर्ज मागवून १३३ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. 

या केंद्रात नागरिकांना शासकीय शुल्कात महसुली सेवा मिळणार आहेत. शैक्षणिक व शासकीय कामासाठी लागणारे सर्व प्रकारचे दाखले व प्रमाणपत्र ग्रामपंचायत कार्यालयात एकाच ठिकाणी मिळणार आहेत. ग्रामपंचायत दाखले, महसुली सेवांसह वीजबिल भरणा, राजपत्र, पॅन कार्ड, लायसन्स, उद्योग, आधार यांसारख्या सर्व प्रकारच्या सेवा आपले सरकार सेवा केंद्रात दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना तालुक्‍याच्या ठिकाणी अथवा तहसील कार्यालयात न जाताही गाव स्तरावर दाखले, शासकीय सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे श्रम व वेळेची बचत होणार आहे. आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना डिजिटल कार्डसाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन रजिस्ट्रेशन करता येत आहे. 

शहरांत ३४, ग्रामीणमध्ये ९९ केंद्रे  नव्याने मंजूर तालुकानिहाय आपले सरकार सेवा केंद्रे अशी (ग्रामीण भागात) : सातारा १८, जावळी दोन, कोरेगाव सहा, कऱ्हाड १४, पाटण तीन, वाई १३, महाबळेश्‍वर दोन, खंडाळा पाच, फलटण २१, माण सहा, खटाव नऊ असे एकूण ९९, तर सातारा शहरात दहा, मेढ्यात एक, रहिमपूरला एक, कऱ्हाड शहरात चार, मलकापुरात पाच, पाटणमध्ये दोन, महाबळेश्‍वरात एक, पाचगणीत एक, लोणंदला तीन, फलटणमध्ये पाच, वडूजला एक असे एकूण ३४ केंद्रांना नव्याने मान्यता दिली आहे. 

शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजना व शिक्षणासाठी आवश्‍यक ते सर्व दाखले, सेवा हमी कायद्याने पुरवण्यात येणाऱ्या सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नव्याने आपले सरकार सेवा केंद्रासाठी नव्याने अर्ज मागविण्या येणार आहेत. - अविनाश शिंदे, उपजिल्हाधिकारी (महसूल)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com