राज्यात तूर खरेदीसाठी १३४ खरेदी केंद्रे सुरू

तूर
तूर

मुंबई  : केंद्र शासनाने या वर्षी तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे ५ हजार ६७५ रुपये इतकी निश्चित केली आहे. राज्यात आधारभूत किमतीने तूर खरेदीसाठी आतापर्यंत १३४ तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच, आणखीही काही खरेदी केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना तूर विक्री करू नये, असे आवाहन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी (ता. ६) केले. या वर्षी राज्यातील तुरीचे उत्पादन कमी प्रमाणात आहे. ज्या भागात तुरीचे उत्पादन जास्त आहे आणि खरेदी केंद्र सुरू करावे अशी शेतकऱ्यांची मागणी असेल, त्या भागातसुद्धा खरेदी केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. आतापर्यंत १७ हजार २६४ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना तूर विक्री करू नये आणि ही विक्री करीत असताना शेतकऱ्यांनी आपला सातबारा उतारा व्यापाऱ्यांना देऊ नये, जर आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापारी तूर खरेदी करत असतील, तर अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री देशमुख यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com