अकोल्यातील दुष्काळग्रस्तांसाठी १३७ कोटी

अकोल्यातील दुष्काळग्रस्तांसाठी १३७ कोटी
अकोल्यातील दुष्काळग्रस्तांसाठी १३७ कोटी

अकोला : अनियमित पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती तयार झाली. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदतीची घोषणा केली. अातापर्यंत तीन टप्प्यात जिल्ह्याला १३७ कोटी ७६ लाख रुपये प्राप्त झाले. त्यापैकी ६० कोटी ८७ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती मिळाली. ही टक्केवारी ४४.२४ एवढी आहे. 

जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर, या पाच तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. या घोषणेनुसार जिल्ह्यातील ७१२ गावांमध्ये विविध सवलती लागू करण्यात आल्या. यासाठी दुष्काळ निधी देण्याचे जाहीर केल्यानुसार तीन टप्प्यात आजवर १३७ कोटी ७६ लाख रुपये मिळाले. पहिल्या दोन टप्प्यात प्रत्येकी ४० कोटी ७७ लाख आणि तिसऱ्या टप्प्यात ५६ कोटी ५ लाख ७० हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला. हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यासाठी तहसील स्तरावर पाठविण्यात आला आहे.

खरिपात कमी पावसामुळे उत्पादकता घटली. या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी व विविध संघटनांकडून करण्यात आली. शासनाने दुष्काळ निवारणाबाबतच्या खरीप हंगाम २०१८ च्या प्राथमिक अहवालानुसार दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली. आता उर्वरित अकोट व पातूर तालुक्यांतही दुष्काळ जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आल्या. अद्याप या नवीन दुष्काळी गावांसाठी निधी आला नाही. 

शासनाकडे १९९ कोटींची मागणी प्रथम दुष्काळ घोषित झालेल्या पाच तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना मदतनिधी वाटप करण्यास सुरवात झाली. आतापर्यंत दोन टप्प्यात मदत निधीचे वाटप करण्यात आले असून तिसऱ्या टप्प्याचा मदत निधी प्रशासनाने तहसील स्तरावर वर्ग करण्यात अाल्याचे सांगण्यात अाले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतनिधी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १९९ कोटी ११ लाख रुपयांची मागणी केली आहे. त्यापैकी १३७ कोटी रुपये प्राप्त झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com