agriculture news in Marathi, 139 crore for crop damage by pre monsoon rain, Maharashtra | Agrowon

अतिवृष्टीतील नुकसानीपोटी १३९ कोटींची मदत वितरित

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जुलै 2019

मुंबई: राज्यात गेल्या वर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी १३९ कोटी रुपयांची मदत राज्य शासनाने वितरित केली आहे. यात सर्वाधिक ४७ कोटी रुपयांची मदत औरंगाबाद विभागाला, तर त्याखालोखाल ४३ कोटी रुपयांची मदत अमरावती विभागातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

मुंबई: राज्यात गेल्या वर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी १३९ कोटी रुपयांची मदत राज्य शासनाने वितरित केली आहे. यात सर्वाधिक ४७ कोटी रुपयांची मदत औरंगाबाद विभागाला, तर त्याखालोखाल ४३ कोटी रुपयांची मदत अमरावती विभागातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

२०१८ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि फळपिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांकडून मदतीची मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावाला २८ जूनच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार हा निधी वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

एकूण १३९ कोटी १९ लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे. हा निधी बाधित शेतकऱ्यांना वितरित करताना दक्षता घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. महसूल व कृषी विभागाच्या विभागीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या पंचनाम्याच्या आधारे पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या प्रकरणी ही मदत दिली जाणार आहे. 

मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करावी, रोख किंवा निविष्ठा स्वरूपात मदत देण्यात येऊ नये. या रक्कमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये. वाटप पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी रक्कमेच्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी असे निर्देश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत.

तसेच ही मदत वितरित करताना रक्कम शेतकऱ्याच्या आधार जोडलेल्या बँक खात्यात करावी, एखाद्या शेतकऱ्याचे बँक खाते आधारशी जोडलेले नसल्यास तो शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी इतर पर्यायी ओळखपत्रांच्या आधारे उदाहरणार्थ आधार ओळख नोंदणी पावती, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, पारपत्र, बँक पासबुक याची खातरजमा करून रक्कम वितरित करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे. 

विभागनिहाय मदत वाटप - कोकण विभाग - ५० लाख रुपये, पुणे - २० कोटी ५२ लाख, नाशिक - १ कोटी १८ लाख, औरंगाबाद - ४७ कोटी, अमरावती - ४३ कोटी ५१ लाख आणि नागपूर विभाग - २६ कोटी ४६ लाख रुपये.


इतर बातम्या
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...