सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४ कोटींची व्याज सवलत 

सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत तीन वर्षांत जिल्ह्यातील ९१ हजार ४६४ शेतकऱ्यांना १४ कोटी ५५ लाख ७ हजार ५८४ रुपये रक्कमेचा लाभ मिळाला आहे.
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४ कोटींची व्याज सवलत 
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४ कोटींची व्याज सवलत 

सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत तीन वर्षांत जिल्ह्यातील ९१ हजार ४६४ शेतकऱ्यांना १४ कोटी ५५ लाख ७ हजार ५८४ रुपये रक्कमेचा लाभ मिळाला आहे. 

त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा यंत्रणा, राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, खासगी बँकांकडून एक लाख रुपयांपेक्षा जास्त, पण तीन लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदत पीककर्ज घेणाऱ्या आणि विहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर उत्पादन प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत दिली जाते. कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत तीन टक्के, तर एक लाख रुपयांपेक्षा जास्त पण तीन लाखांपेक्षा कमी रकमेवर एक टक्का वार्षिक दराने व्याजाची सवलत दिली जाते. सन २०२१-२२ पासून तीन लाखांपर्यंतच्या अल्पमुदती पीककर्जास तीन टक्क्यांप्रमाणे व्याज सवलत लागू करण्यात आली आहे. यासाठी तालुक्याचे सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडून वि.का.स. संस्था अथवा राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, खासगी बँकांच्या शाखांकडून पात्र सभासद शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयास प्राप्त होतात. त्यानंतर सदर योजनेसाठी प्राप्त झालेल्या निधीतून कोशागाराकडून बिल मंजूर झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर व्याज सवलतीची रक्कम जमा करण्यात येते. 

वर्ष शेतकरी संख्या. रक्कम 
२०१९-२० ४२ हजार ४६२ ६ कोटी ५५ लाख ५९ हजार १६१ रुपये
२०२०-२१ २१ हजार ५५७ २ कोटी ९९ लाख ८८ हजार १५५ रुपये 
२०२१-२२ २७ हजार ४४५ ४ कोटी ९९ लाख ६० हजार २६८ रुपये
एकूण ९१ हजार ४६४

१४ कोटी ५५ लाख ०७ हजार ५८४ रुपये 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com