agriculture news in marathi 14 crore interest concession to 51000 farmers in Sangli | Page 2 ||| Agrowon

सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४ कोटींची व्याज सवलत 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021

सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत तीन वर्षांत जिल्ह्यातील ९१ हजार ४६४ शेतकऱ्यांना १४ कोटी ५५ लाख ७ हजार ५८४ रुपये रक्कमेचा लाभ मिळाला आहे. 

सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत तीन वर्षांत जिल्ह्यातील ९१ हजार ४६४ शेतकऱ्यांना १४ कोटी ५५ लाख ७ हजार ५८४ रुपये रक्कमेचा लाभ मिळाला आहे. 

त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा यंत्रणा, राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, खासगी बँकांकडून एक लाख रुपयांपेक्षा जास्त, पण तीन लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदत पीककर्ज
घेणाऱ्या आणि विहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर उत्पादन प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत दिली जाते. कर्जाची परतफेड करणाऱ्या
शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत तीन टक्के, तर एक लाख रुपयांपेक्षा जास्त पण तीन लाखांपेक्षा कमी रकमेवर एक टक्का वार्षिक दराने व्याजाची सवलत दिली
जाते. सन २०२१-२२ पासून तीन लाखांपर्यंतच्या अल्पमुदती पीककर्जास तीन टक्क्यांप्रमाणे व्याज सवलत लागू करण्यात आली आहे. यासाठी तालुक्याचे सहायक
निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडून वि.का.स. संस्था अथवा राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, खासगी बँकांच्या शाखांकडून पात्र सभासद शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा
उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयास प्राप्त होतात. त्यानंतर सदर योजनेसाठी प्राप्त झालेल्या निधीतून कोशागाराकडून बिल मंजूर झाल्यानंतर संबंधित
शेतकऱ्याच्या खात्यावर व्याज सवलतीची रक्कम जमा करण्यात येते. 

वर्ष शेतकरी संख्या. रक्कम 
२०१९-२० ४२ हजार ४६२ ६ कोटी ५५ लाख ५९ हजार १६१ रुपये
२०२०-२१ २१ हजार ५५७ २ कोटी ९९ लाख ८८ हजार १५५ रुपये 
२०२१-२२ २७ हजार ४४५ ४ कोटी ९९ लाख ६० हजार २६८ रुपये
एकूण ९१ हजार ४६४

१४ कोटी ५५ लाख ०७ हजार ५८४ रुपये 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
शेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊ!जलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...