Agriculture news in marathi 14 crores of maize chukarya On the account of the farmer | Agrowon

मका चुकाऱ्याचे १४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 एप्रिल 2021

औरंगाबाद जिल्ह्यातील ११ केंद्रांवरून खरेदी करण्यात आलेल्या मक्याच्या चुकाऱ्यापोटी सुमारे साडेचौदा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांनी दिली.

औरंगाबाद: जिल्ह्यातील ११ केंद्रांवरून खरेदी करण्यात आलेल्या मक्याच्या चुकाऱ्यापोटी सुमारे साडेचौदा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांनी दिली. सर्व केंद्रावरून ७८ हजार ५७४ क्‍विंटल मकाची खरेदी करण्यात आली होती. 

औरंगाबाद जिल्ह्यात किमान आधारभूत किमतीने मका खरेदीसाठी ११ केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, पिशोर, फुलंब्री, करमाड, सिल्लोड, सोयगाव, लासूर, तुर्काबाद आदी केंद्राचा समावेश होता. या केंद्रापैकी तुर्काबाद व पिशोर वगळता सर्व केंद्रावरून ४, ५५६ शेतकऱ्यांनी मकाच्या किमान आधारभूत किमतीने खरेदीसाठी नोंदणी केली होती. 
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी २,७४४ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले होते. त्यापैकी १,८६५ शेतकऱ्यांकडून ७८,५७४ क्‍विंटल ५० किलो मक्याची १८५० रुपये प्रतिक्‍विंटलने खरेदी करण्यात आली.

खरेदी करण्यात आलेल्या मकाच्या चुकाऱ्याची १४ कोटी ५३ लाख ६२ हजार ८२५ रुपये झाले होते. मार्चच्या मध्यापर्यंत पूर्ण चुकारे जमा करण्यात आल्याचेही औरंगाबादच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांनी 
स्पष्ट केले.

तूर, हरभरा खरेदीला अल्प प्रतिसाद 
औरंगाबाद जिल्ह्यात हरभऱ्याच्या किमान आधारभूत किमतीने खरेदीसाठी सात केंद्र सुरू करण्यात आली. यामध्ये गंगापूर, औरंगाबाद, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव, फुलंब्री आदी केंद्राचा समावेश होता. या केंद्रांपैकी गंगापूर, औरंगाबाद व खुलताबाद या तीन केंद्रावरून नोंदणीला प्रतिसाद मिळत ३०३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ३०२ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले. ६ एप्रिलपर्यंत त्यापैकी १०३ शेतकऱ्यांकडील ५६९ क्‍विंटल हरभऱ्याची प्रत्यक्ष खरेदी करण्यात आली.  

दुसरीकडे तूर खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या ७ केंद्रापैकी औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद या तीन केंद्रांवरून नोंदणीला प्रतिसाद मिळाला. ३३१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचा एसएमएस पाठविण्यात आला. परंतु सहा हजार रुपये प्रतिक्‍विंटल या किमान आधारभूत किमतीने प्रत्यक्ष तूर खरेदीला प्रतिसाद मिळाला नाही.

जालन्यात हरभऱ्याचे ९० लाखांचे चुकारे जमा
जालना : जिल्ह्यातील दहा केंद्रांवरून आधारभूत किमतीने खरेदी केलेल्या हरभऱ्यापैकी ९० लाखांचे चुकारे अदा करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विमल वाघमारे यांनी दिली. दुसरीकडे जिल्ह्यात तूर खरेदीला प्रतिसादच मिळत नसून, खरेदी करण्यात आलेल्या मक्याचेही चुकारे अदा करण्यात आल्याचे वाघमारे यांनी सांगितले. 

   जालना जिल्ह्यात हरभऱ्याची ५,१०० रुपये प्रतिक्‍विंटल या किमान आधारभूत किमतीने हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी दहा केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये जालना, अंबड, तिर्थपुरी, मंठा, भोकरदन, परतूर, जाफराबाद, सातोना, तळणी, माहोरा येथील केंद्राचा समावेश आहे. या केंद्रावरून ४९९१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या या शेतकऱ्यांपैकी २,५४५ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी ५७३ शेतकऱ्यांकडील ७५८३ क्‍विंटल २१ किलो हरभऱ्याची किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली. मार्चअखेरपर्यंत यापैकी १३१ शेतकऱ्यांना त्यांच्या खरेदी केलेल्या १७७७ क्‍विंटल हरभऱ्याच्या चुकाऱ्यापोटी ९० लाख ६२ हजार ७०० रुपये अदा करण्यात आल्याचे वाघमारे म्हणाल्या. खरेदी केलेल्या हरभऱ्याची एकूण रक्‍कम ४ कोटी ३० लाख ५३ हजार ४०० 
रुपये होते.

तुरीच्या किमान आधारभूत किमतीने खरेदीसाठी ९ केंद्र सुरू करण्यात आली. या केंद्रांवरून २२४५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यांना एसएमएसही पाठविण्यात आले. परंतु प्रत्यक्ष खरेदीसाठी प्रतिसादच मिळाला नाही. मक्याच्या खरेदीसाठी जिल्ह्यात ७ केंद्र सुरू करण्यात आली होती. अंबड, भोकरदन, जालना, तिर्थपूरी, जाफराबाद, मंठा, परतूर या केंद्राचा यामध्ये समावेश होता. यापैकी तीन केंद्रावरून १४१२ शेतकऱ्यांकडील ५८ हजार १८१ क्‍विंटल ५० किलो मका आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या या मक्याच्या चुकाऱ्यापोटीची रक्‍कम अदा करण्यात आल्याचेही जिल्हा मार्केटिंग अधिकारी विमल वाघमारे यांनी स्षष्ट केले.


इतर बातम्या
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
दिग्गज प्रस्थापितांमध्ये रंगणार ‘गोकुळ’...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
‘शेती’वरही निर्बंध; दुकाने फक्त 'या'...पुणे : कोरोना विषाणूच्या जीवघेण्या साथीला पायबंद...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
मोसंबीच्या वाण निवडीसाठी संशोधन...औरंगाबाद : राज्यातील शेतकऱ्यांना सध्या अस्तित्वात...
जगाची ‘फळांची करंडी’ होण्याची...पुणे ः ‘घरी ज्याच्या फळांची करंडी तोची असे खरा...
कोकणात बांधावरच्या पिकांची होणार...पुणे : कोकणातील दुर्लक्षित परंतु येत्या काळात...
विदर्भात आजपासून पावसाची शक्यतापुणे : विदर्भाच्या अनेक भागांत अंशतः ढगाळ...
राज्यात अद्याप ३६ कारखान्यांचा हंगाम...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात हुपरी (ता. हातकणंगले...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...