परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून १४ हजार ५३१ पीकविमा प्रस्ताव

परभणी  जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून १४ हजार ५३१ पीकविमा प्रस्ताव
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून १४ हजार ५३१ पीकविमा प्रस्ताव

परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरिपासाठी बुधवारपर्यंत (ता. १०) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १४ हजार ५३१ विमा प्रस्ताव सादर केले. एकूण ६५ लाख ७१ हजार रुपये विमा हप्ता भरून ८ हजार ४२०.११ हेक्टरवरील पिकांसाठी २९ कोटी २७ लाख ४६ हजार ९७६ रुपयांचे विमा संरक्षण घेतले. पीकविमा संरक्षणासाठी इच्छुक शेतकऱ्यांना बुधवार (ता. २४) पर्यंत प्रस्ताव सादर करता येतील, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बुधवारपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जनसुविधा केंद्र (सीएसी) वर १४ हजार ४१८ विमा प्रस्ताव सादर केले. त्याद्वारे ८ हजार ३२७ हेक्टरवरील पिकांसाठी संरक्षण घेतले. त्यासाठी ६४ लाख ७३ हजार ८४९ रुपयांचा विमा हप्ता भरला. बॅंकांमध्ये ४४ विमा प्रस्ताव सादर झाले. ४०.०५ हेक्टरवरील पिकांसाठी शेतकऱ्यांनी ५५ हजार ६४० रुपये विमा हप्ता भरला. 

पीक विमा संरक्षित रक्कम (प्रतिहेक्टरी)  विमा हप्ता (रुपये)
सोयाबीन ४३००० ८६०
मूग १९००० ३८०
उडीद १९००० ३८०
तूर ३१५०० ६३०
कपाशी ४३००० २१५०
ज्वारी २४५०० ४९०
बाजरी २०००० ४००
भात ४३५०० ८७०
सूर्यफूल २३१०० ४६२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com