agriculture news in marathi, 14 thousand farmers application for Horticulture Schem | Agrowon

सोलापूर जिल्ह्यातून फळबाग योजनेसाठी १४ हजार शेतकऱ्यांचे अर्ज
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 सप्टेंबर 2018

सोलापूर : यंदाच्या वर्षापासून राज्य शासनाने (कै.) कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातून १४ हजार ७८ शेतकऱ्यांचे अर्ज कृषी विभागाकडे आले आहेत.
या सर्व अर्जांची छाननी होऊन ते मंजूर होणार आहेत.

सोलापूर : यंदाच्या वर्षापासून राज्य शासनाने (कै.) कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातून १४ हजार ७८ शेतकऱ्यांचे अर्ज कृषी विभागाकडे आले आहेत.
या सर्व अर्जांची छाननी होऊन ते मंजूर होणार आहेत.

या योजनेतील सर्व सहभागी शेतकऱ्यांना मंजुरी मिळाल्यास जवळपास १२ हजार हेक्‍टर क्षेत्र नव्याने फळबागेखाली येणार आहे. सध्या राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केवळ जॉब कार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी फळबाग लागवडीच्या अनुदानासाठी पात्र ठरतात. त्यामुळे या योजनेचा लाभ मर्यादित शेतकऱ्यांना होत होता, पण या योजनेमुळे सरसकट सर्व शेतकऱ्यांना संधी मिळणार आहे.

या योजनेत आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, विकसित जाती, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिक्कू, संत्रा, मोसंबी, अंजीर, नारळ आदींचा समावेश आहे. सोलापुरात अर्ज केलेल्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक डाळिंबाचे शेतकरी आहेत. आता पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी केल्यानंतर सलग तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने हे अनुदान वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 

इतर बातम्या
कापूस लोकायची लाज राखते; पण आमचं काय? यवतमाळ : ‘‘आमच्या कापसापासून तयार कपड्यानं आमी...
अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर...अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४...सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या...
पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे...पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ...
अमरावती जिल्ह्यात ज्वारी ठरेल रब्बीत...अमरावती  ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी...
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा...नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे...
परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायमपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
सटाणा तालुक्यात शेतीशेजारील पाझर तलाव...नाशिक  : सटाणा तालुक्यातील चौगाव, अजमीर...
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढसातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी,...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप...
एकदम बाजार समित्या बरखास्त करू नका:...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात...कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर...
ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे...मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घटपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता...परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि...
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर...पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील...
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण...मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना...
पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची...औरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून...
आंतरराष्ट्रीय द्राक्ष चर्चासत्र आजपासूनपुणे: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (एनआरसीजी)...