राज्यात पाच वर्षांत १४ हजार शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

शेतकरी आत्महत्या
शेतकरी आत्महत्या

सोलापूर : दुष्काळ, गारपीट, अवकाळी अन्‌ गडगडलेले शेतीमालांचे दर, बॅंकांचा कर्जवाटपात ठेंगा व सरकारी मदतीची प्रतीक्षा आणि डोक्‍यावरील सावकाराचे कर्ज या प्रमुख कारणांमुळे मागील पाच वर्षांत राज्यात तब्बल १४ हजार ७४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. त्यामध्ये अमरावती विभाग अव्वल असून, औरंगाबाद विभाग दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.  मागील तीन-चार वर्षांत राज्यात दोन वेळा दुष्काळ पडल्याने रब्बी व खरीप हंगाम पुरता वाया गेला. त्यातच शेतीमालांचे दरही अस्थिर आहेत. सरकारने हमीभावाने खरेदी केलेल्या शेतीमालांचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत. कर्जमाफीची प्रतीक्षा तर तूर, हरभरा, कांदा अनुदानाची व हमीभावाचीही रक्‍कम बहुतांशी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दुष्काळ निधी अथवा नुकसान भरपाईची प्रतीक्षाच आहे. दुष्काळामुळे शेतात उभे पीक नसल्याने बॅंकाही दरवाजात उभ्या करीत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असलेल्या शेतकऱ्याला मुला-मुलीच्या विवाहासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे नाइलाजास्तव खासगी सावकारांकडून चढ्या व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. त्यासाठी शेती गहाण ठेवावी लागते. काही दिवसांनंतर सावकाराचा तगादा, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न आणि त्यातच दुसऱ्या मुला-मुलीचा विवाह तोंडावर असतो. त्यामुळे या सर्व परिस्थितीला कंटाळून शेतकरी जगाचा निरोप घेतो.  १८ वर्षांतील आत्महत्या   

२००१ ६२
    २००२   १२२ 
२००३ १८० 
२००४ ६४०
२००५ ६०९ 
२००६  २,३७६ 
२००७  २,०७६ 
२००८  १,९६६ 
२००९ १,६०५ 
२०१० १,७४१ 
२०११  १,५१८
२०१२ १,४७३ 
२०१३     १,२९६ 
२०१४  २,०३९ 
२०१५  ३,२६३ 
२०१६   ३,०८० 
२०१७   २,९१७ 
२०१८ २,७६१ 
एकूण    २९,७२४

     विभागनिहाय पाच वर्षांतील आत्महत्या  

अमरावती ५,२३२
औरंगाबाद ४,६९८
नाशिक २,१५३
नागपूर १,५८५
पुणे  ३९१
कोकण १५
एकूण १४,०७४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com