agriculture news in Marathi 14 thousand farmers waiting for maize procurement Maharashtra | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यातील १४ हजार शेतकरी मका विक्रीच्या प्रतिक्षेत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

१८ हजार ६८० शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी केली. मात्र खरेदी पुर्ण होण्यापुर्वीच ही प्रक्रीया बंद करण्यात आल्याने सुमारे १४५०० शेतकऱ्यांचा मका विक्री होऊ शकलेला नाही.

बुलडाणा ः जिल्ह्यातील १८ हजार ६८० शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी केली. मात्र खरेदी पुर्ण होण्यापुर्वीच ही प्रक्रीया बंद करण्यात आल्याने सुमारे १४५००  शेतकऱ्यांचा मका विक्री होऊ शकलेला नाही. जिल्ह्यात सद्यःस्थितीत किमान पाच लाख क्विंटलपेक्षा अधिक मका शिल्लक असून शासनाने मुदतवाढ देत या मक्याची खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार मका खरेदीसाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात खरेदी केंद्र उघडण्यात आले होते.  जिल्ह्यातील १८ हजारांवर मका उत्पादकांनी नावनोंदणी केली. मात्र राज्याला दिलेले साडे अकरा लाख क्विंटल खरेदीचे उद्दीष्ट पुर्ण झाल्याने ही प्रक्रीया ३१ जुलैपुर्वीच बंद करण्यात आली. याचा फटका जिल्ह्यातील मका उत्पादकांना सर्वाधिक बसला.

विदर्भात बुलडाणा हा मका उत्पादनातील सर्वाधिक क्षेत्र राहणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बुलडाणा, मलकापूर, मोताळा, नांदुरा, चिखली, मेहकर, देऊळगावराजा, खामगाव, सिंदखेडराजा, संग्रामपूर आदी तालुक्यांत मक्याची लागवड दरवर्षी वाढत आहे. यंदा लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी राहल्याने हे पीक चांगले आलेले आहे. खरेदी न झाल्याने सध्या या एकट्या जिल्हयात शेतकऱ्यांकडे सुमारे ५ लाख क्विंटलपेक्षा अधिक मका पडून असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर काही वाहने केंद्रासमोर उभी आहेत. 

सध्या बाजारात मक्याचे दर अवघे १००० ते ११०० दरम्यान आहेत. सध्या पावसाळा सुरु झालेला असल्याने बाजारपेठेत मका विक्री करतानाही असंख्य अडचणी येत आहे. तर मका घरातच पडून राहल्याने त्याला किड लागण्याची शक्यता वाढत आहे. 

राजकारणी  सरसावले
मका उत्पादकांचा प्रश्न पाहता जिल्ह्यातील राजकारणी सरसावले आहेत. सर्वच पक्षांकडून मका खरेदीची मागणी शासनाकडे करण्यात येत आहे. काही संघटनांनी तर आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे. तर जिल्हा प्रशासनाने मका खरेदीला मुदतवाढ देण्याची यापुर्वीच मागणी केलेली आहे. परंतु खरेदीचा चेंडू आता शासनाच्या दालनात असल्याने त्याचा निर्णय मुंबई व दिल्लीत होणे अपेक्षित आहे. 

प्रतिक्रीया
यावर्षी मी दोन एकरांत लागवड केली होती. माझ्याकडे ५० क्विंटल मका आहे. जेव्हा ‘नाफेड’ने नोंदणी सुरु केली तेव्हा पहिल्याच दिवशी आम्ही नोंदणी केली होती. मात्र आता ही खरेदी बंद झाल्याने अडचणी उभ्या राहल्या आहेत. बाजारात १२०० ते १२५० रुपयांनी मका विकत आहे. क्विंटलला पाचशे रुपयांपेक्षा अधिक फटका बसणार आहे. 
- सुनिल काशीराम मिरगे, रा. डिडोळा बुद्रूक, ता. मोताळा जि.  बुलडाणा


इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...