agriculture news in marathi, 14 thousand in Sangli district Farmer deprived of power connections | Agrowon

सांगली जिल्ह्यात १४ हजार शेतकरी वीज जोडणीपासून वंचित

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

सांगली : जिल्ह्यातील १४ हजारांहून अधिक शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाजारी व्यक्त होत आहे. यामध्ये जत तालुक्‍यातील सर्वांधिक दोन हजार ९१६ वीज जोडण्या प्रलंबित आहेत. 

सांगली : जिल्ह्यातील १४ हजारांहून अधिक शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाजारी व्यक्त होत आहे. यामध्ये जत तालुक्‍यातील सर्वांधिक दोन हजार ९१६ वीज जोडण्या प्रलंबित आहेत. 

जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू, म्हैसाळ, ताकारी या सिंचन योजनांचे सध्या अवर्तन सुरू आहे. शिवाय, प्रत्येक हंगामात आवर्तन सुरू होत असल्याने या योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतकरीही पारंपरिक शेती सोडून बागायत आणि आधुनिक शेतीकडे वळला आहे. आज डाळिंब आणि द्राक्ष शेती जिल्‍ह्याच्या या दुष्काळी पट्टयातच मोठ्या प्रमाणात पिकविली जाते. पण, वीज जोडणीसाठी अर्ज करूनही शेतकऱ्यांना वीज कनेक्‍शन दिले जात नाही. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असूनही हे शेतकरी आपले क्षेत्र बागायती करू शकत नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

जिल्ह्यात आज अखेर १४ हजार ३०० वीज जोडण्या प्रलंबित आहेत. यामध्ये तीन एचपीपासून ते १० एचपीपर्यंतच्या जोडण्यांचा समावेश आहे. मिरज, पलूस, शिराळा, वाळवा, तासगाव या तालुक्‍यांतील वीज जोडण्या या ५०० पेक्षा कमी आहेत. या वीज जोडण्या पूर्ण झाल्यातर उपलब्ध असलेल्या वीजवितरण प्रणालीवर परिणाम होणार असल्याने १०, १६, २५ आणि ६३ केव्हीए क्षमतेची विद्युत रोहित यंत्रे उभारण्यात येणार असून यासाठी १५ उपकेंद्रांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये कवठे महांकाळ आणि जत तालुक्‍यात प्रत्येकी तीन, वाळवा, मिरज, तासगाव, खानापूर आणि पलुस तालुक्‍यांत प्रत्येकी एक आणि आटपाडी आणि कडेगाव तालुक्‍यांत प्रत्येकी दोन उपकेंद्रे उभारण्यात येणार आहे. 

या उपकेंद्रांना मंजुरी मिळाली असून ती उभारण्याची काही ठिकाणी कामे सुरू झाली आहेत. अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

तालुकानिहाय वीज जोडण्याची आकडेवारी

तालुका संख्या
जत २ हजार ९१६ 
कवठे महांकाळ १ हजार २१२
खानापूर १ हजार ५६०
कडेगाव १ हजार ११०
आटपाडी १ हजार ९४

 


इतर बातम्या
रताळे वनस्पती गंधाद्वारे देते अन्य...एखाद्या हल्ल्याची चाहूल लागल्यास बहुतांश सजीव...
शेतमाल तारण योजनेअंतर्गत कारंजा बाजार...कारंजालाड, जि. वाशीम  ः शेतकऱ्यांचा शेतमाल...
खानदेशात कापूस दर स्थिर; खेडा खरेदीला...जळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
अधिक ओलावा असलेल्या कापसासाठी हवी...वर्धा ः कापसात ओलावा असल्यामुळे प्रक्रिया उद्योजक...
मराठवाड्यात पाच मोठे प्रकल्प तुडुंब औरंगाबाद : मराठवाड्यातील ११ पैकी पाच मोठे...
शेतमालाच्या शिवार खरेदीवर लक्ष द्या :...जळगाव  ः खानदेशात कापसापाठोपाठ केळी, कांदा व...
सोलापुरात चारा छावण्यांवर २४५ कोटी...सोलापूर ः दुष्काळामध्ये जिल्ह्यात चारा छावण्यांवर...
नाशिक : पणन मंडळाच्या केंद्रातून दुबईला...नाशिक : कसमादे पट्ट्यात सटाणा, कळवण, मालेगाव...
शेतीपूरक उद्योगाची कास धरा ः पोकळे जालना  : ‘‘निसर्गाच्या लहरीपणामुळे कोरडवाहू...
परभणी जिल्ह्यात ज्वारीची ८७ हजार...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गुरुवार...
कांदा व्यापाऱ्यांच्या साठा तपासणीची...नाशिक  : कांदा दराने मोठी उसळी घेतल्याने व...
सोलापूर जिल्ह्यात मदतीचे अनुदान...सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात...
सांगली : पूरग्रस्तांसाठी १०२ कोटी...सांगली : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
पुणे विभागात रब्बीचा साडेसात लाख...पुणे  ः चार ते पाच दिवसांपूर्वी अनेक भागांत...
शिरुरमधील साडेसहा हजारांवर शेतकरी...पुणे  ः यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
सरकारच्या निर्णयाचा जिल्हा परिषदेला...नगर  ः राज्य सरकारने मागील सरकारच्या काळात...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...