agriculture news in marathi 1400 to 2500 rate for green chillies in Nashik | Page 2 ||| Agrowon

नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १४०० ते २५०० रुपये दर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 ऑगस्ट 2021

नाशिक : नाशिक बाजार समितीमध्ये गत सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक १,१४८ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल १,४०० ते २,५०० रुपये, तर सरासरी दर २,००० रुपये मिळाला.

नाशिक : नाशिक बाजार समितीमध्ये गत सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक १,१४८ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल १,४०० ते २,५०० रुपये, तर सरासरी दर २,००० रुपये मिळाला. सध्या बाजारपेठेत मागणी, दर सर्वसाधारण होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

चालू सप्ताहामध्ये कांद्याची आवक ११,३८८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६०० ते १,९११ मिळाला. तर सरासरी दर १,५०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ६०६४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४०० ते १,३५०, तर सरासरी दर ७९० रुपये राहिला. लसणाची आवक १३२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३,००० ते १०,५००, तर सरासरी दर ८,५०० रुपये राहिला. आल्याची आवक १,००९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,५०० ते ३,५००, तर सरासरी दर २,२५० रुपये राहिला. 

फळभाज्यांच्या आवकेत चढ-उतार दिसून आला. त्यानुसार दर निघाले. घेवड्याला प्रतिक्विंटल ८०० ते १,५००, तर सरासरी दर १२०० रुपये राहिला. गाजराची आवक १४९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,००० ते १,५०० तर सरासरी दर १,३०० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ५० ते १२५, तर सरासरी ८०, वांगी १०० ते २७०, तर सरासरी १७० व फ्लॉवर ६० ते १६५ सरासरी १०० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला ४० ते १२० तर सरासरी ८५ रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. 

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा ४० ते ११०, तर सरासरी ७५, कारले १५० ते २२५, तर सरासरी २००, गिलके ३५० ते ४५०, तर सरासरी ४००, दोडका २५० ते ३२५ तर सरासरी दर ३०० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला १२५ ते ३०० तर सरासरी २०० रुपये असे २० किलोस दर मिळाले. फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक ६९०क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ५,००० ते १०,००० तर सरासरी दर ५,५०० रुपये मिळाला.

डाळिंबांची आवक १२,६७० क्विंटल झाली. मृदुला वाणास २,५०० ते ९,०००, तर सरासरी ६,००० रुपये दर मिळाला. आंब्याची आवक ६० क्विंटल झाली. नीलम वाणास ३,००० ते ६,५०० तर सरासरी ५,००० रुपये मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
नगरमध्ये हिरवी मिरची, भेंडी, दोडक्याला...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात पालेभाज्यांच्या दरात वाढ पुणे : खरीप हंगामानंतर भाजीपाल्याचे रब्बीचा हंगाम...
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५०...औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
राज्यात मूग ४००० ते ८५०० रुपये क्विंटललातुरात सरासरी ६५०० ते ६८२० रुपये  लातूर :...
औरंगाबादमध्ये बटाटे स्थिर, वांगी, मिरची...औरंगाबादमध्ये : भाजीपाल्याचे दर सगळीकडेच...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक, दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये उडदाला ५००० ते ६८०० रुपयेनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...