नगर ः छावणीचालकांच्या खात्यांवर १४६ कोटी

छावणीचालकांच्या खात्यांवर १४६ कोटी
छावणीचालकांच्या खात्यांवर १४६ कोटी

नगर ः ‘‘पशुधन जगविण्यासाठी जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. या छावण्यांसाठी आजअखेर १७४ कोटींचे अनुदान प्राप्त झाले. यापैकी १४६ कोटी रुपयांचे अनुदान छावणीचालकांच्या खात्यांवर जमा करण्यात आले. उर्वरित निधीचे वाटप सुरू आहे. जून महिन्यासाठी सरकारकडे आणखी ८५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. दुसरीकडे, छावणीच्या कारभारात बेशिस्तपणा करून अटी-शर्तींचा भंग केलेल्या ४०५ छावणीचालकांकडून ९४ लाखांचा दंड अनुदानातून वसूल करण्यात आला,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. 

पशुधन जगविण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी ५११ चारा छावण्यांना मंजुरी दिली. जूनपर्यंत ५०४ छावण्या सुरू होत्या. त्यात साडेतीन लाख पशुधन दाखल होते. मागील काळात झालेल्या पावसामुळे चाराछावण्यांची संख्या घटली. जुलैच्या सुरवातीला ३५० चाराछावण्या बंद झाल्या होत्या. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने पुन्हा संख्या वाढली. 

शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या सुविधेसाठी सुरू असलेल्या चाराछावण्यांतून योग्य पद्धतीने सुविधा मिळतात का, यासाठी छावण्यांच्या व्यवस्थापनाची तपासणी नियमितपणे करण्यात आली. तपासणीमध्ये अटी- शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी छावणीचालक संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जूननंतर तीन वेळा चाराछावण्या व टॅंकरची मुदत वाढविण्यात आली. तीन वेळा मुदतवाढ देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जिल्ह्यामध्ये ९० छावण्या जिल्ह्याच्या अनेक भागात अजून पाऊस झालेला नाही. त्यामुळे जनावरे जगवण्यासाठी छावण्या सुरू ठेवण्याची मागणी सुरूच आहे. नगर जिल्ह्यामधील जामखेड तालुक्यात ०५, कर्जत तालुक्यात ३६, पाथर्डी तालुक्यात २९ व शेवगाव तालुक्यात २० अशा चार तालुक्यात आजअखेर ९० छावण्या सुरू आहेत. त्यांत ५२ हजार ४८२ जनावरे जगवली जात आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com