Agriculture news in Marathi, 146 crore on the accounts of the camp driver | Page 2 ||| Agrowon

नगर ः छावणीचालकांच्या खात्यांवर १४६ कोटी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नगर ः ‘‘पशुधन जगविण्यासाठी जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. या छावण्यांसाठी आजअखेर १७४ कोटींचे अनुदान प्राप्त झाले. यापैकी १४६ कोटी रुपयांचे अनुदान छावणीचालकांच्या खात्यांवर जमा करण्यात आले. उर्वरित निधीचे वाटप सुरू आहे. जून महिन्यासाठी सरकारकडे आणखी ८५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. दुसरीकडे, छावणीच्या कारभारात बेशिस्तपणा करून अटी-शर्तींचा भंग केलेल्या ४०५ छावणीचालकांकडून ९४ लाखांचा दंड अनुदानातून वसूल करण्यात आला,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. 

नगर ः ‘‘पशुधन जगविण्यासाठी जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. या छावण्यांसाठी आजअखेर १७४ कोटींचे अनुदान प्राप्त झाले. यापैकी १४६ कोटी रुपयांचे अनुदान छावणीचालकांच्या खात्यांवर जमा करण्यात आले. उर्वरित निधीचे वाटप सुरू आहे. जून महिन्यासाठी सरकारकडे आणखी ८५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. दुसरीकडे, छावणीच्या कारभारात बेशिस्तपणा करून अटी-शर्तींचा भंग केलेल्या ४०५ छावणीचालकांकडून ९४ लाखांचा दंड अनुदानातून वसूल करण्यात आला,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. 

पशुधन जगविण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी ५११ चारा छावण्यांना मंजुरी दिली. जूनपर्यंत ५०४ छावण्या सुरू होत्या. त्यात साडेतीन लाख पशुधन दाखल होते. मागील काळात झालेल्या पावसामुळे चाराछावण्यांची संख्या घटली. जुलैच्या सुरवातीला ३५० चाराछावण्या बंद झाल्या होत्या. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने पुन्हा संख्या वाढली. 

शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या सुविधेसाठी सुरू असलेल्या चाराछावण्यांतून योग्य पद्धतीने सुविधा मिळतात का, यासाठी छावण्यांच्या व्यवस्थापनाची तपासणी नियमितपणे करण्यात आली. तपासणीमध्ये अटी- शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी छावणीचालक संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जूननंतर तीन वेळा चाराछावण्या व टॅंकरची मुदत वाढविण्यात आली. तीन वेळा मुदतवाढ देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जिल्ह्यामध्ये ९० छावण्या
जिल्ह्याच्या अनेक भागात अजून पाऊस झालेला नाही. त्यामुळे जनावरे जगवण्यासाठी छावण्या सुरू ठेवण्याची मागणी सुरूच आहे. नगर जिल्ह्यामधील जामखेड तालुक्यात ०५, कर्जत तालुक्यात ३६, पाथर्डी तालुक्यात २९ व शेवगाव तालुक्यात २० अशा चार तालुक्यात आजअखेर ९० छावण्या सुरू आहेत. त्यांत ५२ हजार ४८२ जनावरे जगवली जात आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 
 


इतर ताज्या घडामोडी
नगर : चारा उत्पादनाबाबत मिळतेय अंदाजे...नगर ः खरीप, रब्बी हंगामासह चारापिके, कुरण, जंगल...
कर्जमाफीची दुसरी यादी उद्यासोलापूर : महाविकास आघाडीने महात्मा जोतिराव फुले...
सातारा जिल्ह्यात अवघे ३२ टक्के कर्जवाटपसातारा ः जिल्ह्यातील कर्जमाफीत अडकलेल्या...
नाशिक विभागात पहिल्या टप्प्यात होणार ७१...नगर  ः राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचे...
खानदेशात कापसाची खेडा खरेदी मंदावलीजळगाव  ः खानदेशात कापसाची बाजारातील आवक कमी...
मुली, स्त्रियांमध्ये अजूनही...जळगाव  : मुली, स्त्रियांमध्ये अजूनही...
दोडामार्ग : साडेतीन हजार केळी झाडांचे...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यातील वीजघर, बांबर्डे (...
पवनारमधील शेती कसण्यासाठी करावा लागतोय...वर्धा  ः धाम नदीच्या दुसऱ्या बाजूस शेती...
व्यवस्थापन मसाला पिकांचे...मिरी वेल आणि जायफळास पुरेसे पाणी आणि खत...
उष्ण तापमानाचा केळी बागेवर परिणामउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
लागवड पालेभाज्यांची....पाण्याची उपलब्धता असल्यास कमी कालावधीत...
वर्षभरात चार हंगामांत फायदा देणारा घेवडासातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात बहुतांशी उसाचे...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची १८७५ ते २८१०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...