Agriculture news in Marathi, 147 samples of water from Sangli district are contaminated | Agrowon

सांगली जिल्ह्यातील पाण्याचे १४७ नमुने दूषित
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

सांगली  : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बहुतांश गावातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. पाणी आणि स्वच्छता विभागाच्या वतीने मे महिन्यात तपासलेल्या १८२७ नमुन्यांपैकी १४७ नमुने दूषित आढळून आले आहेत. 

पाण्यात वापरण्यात येणाऱ्या ४३१ ठिकाणची टीसीएलचीही तपासणी करण्यात आली असून चौदा ठिकाणी ते निकृष्ट आढळून आले आहे. या ग्रामपंचायतींना  जिल्हा परिषद  आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या  विविध यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची व पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या टीसीएलची तपासणी केली जाते. 

सांगली  : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बहुतांश गावातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. पाणी आणि स्वच्छता विभागाच्या वतीने मे महिन्यात तपासलेल्या १८२७ नमुन्यांपैकी १४७ नमुने दूषित आढळून आले आहेत. 

पाण्यात वापरण्यात येणाऱ्या ४३१ ठिकाणची टीसीएलचीही तपासणी करण्यात आली असून चौदा ठिकाणी ते निकृष्ट आढळून आले आहे. या ग्रामपंचायतींना  जिल्हा परिषद  आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या  विविध यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची व पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या टीसीएलची तपासणी केली जाते. 

जिल्ह्यातील १८२७ ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १४७ पाणी नमुने दूषित आढळले. यामध्ये तासगाव तालुक्यात सर्वाधिक ३०, जत तालुक्यात २८, कडेगाव तालुक्यात २६, शिराळा १५, आटपाडी ६, कवठेमहांकाळ ३, मिरज १३, पलूस ६, वाळवा ११, खानापूर ९ इतके पाणी नमुने दूषित आढळले आहेत. 

टीसीएलचे ४३१ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १४ नमुने दूषित आढळले. क्लोरिनचे प्रमाण २० टक्केपेक्षा कमी असणारे टीसीएल निकृष्ट असते. त्यानुसार १४ ठिकाणचे टीसीएल निकृष्ट असल्याचे समोर आले. ११७ ठिकाणी टीसीएलमध्ये क्लोरिनचे प्रमाण २० ते ३० टक्के आढळले असून ३०० ठिकाणी क्लोरिनचे प्रमाण ३० टक्केहून अधिक म्हणजे योग्य असल्याचे समोर आले आहे. 

मिरज तालुक्यातील तानंग, कान्हरवाडी, पाटगाव, तासगाव तालुक्यातील वाघापूर, शिराळा तालुक्यातील बेलेवाडी, कणदूर, वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर, किल्लेमच्छिंद्रगड, कुंडलवाडी, जत तालुक्यातील हळ्ळी, उटगी, निगडी बुद्रुक, सोनलगी व उमदी या ठिकाणी निकृष्ट टीसीएल आढळले आहे. दुष्काळात जनता होरपळत असताना, पुन्हा या नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत असल्यामुळे आजाराचे प्रमाणही वाढले आहे. 

याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांना विचारले असता ते म्हणाले, की दुष्काळी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरमधील पाणी तपासणी करूनच नागरिकांना पाणी दिले जात आहे. दूषित पाणी आढळल्यास तो टँकर नागरिकांना पिण्यासाठी पाठविला जात नाही.

इतर बातम्या
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...
ग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...
हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...
नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...
रेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...
परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...
‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...
पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...
शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...
मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...
थकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...
रेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...
अमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...
लष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...
अनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...