साताऱ्यात शेततळे योजनेतून १४८६ शेततळी पूर्ण 

साताऱ्यात शेततळे योजनेतून १४८६ शेततळी पूर्ण 
साताऱ्यात शेततळे योजनेतून १४८६ शेततळी पूर्ण 

सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह्यात आजपर्यंत जिल्ह्यात १४८६ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मागील चार ते पाच महिन्यांपासून या योजनेस प्रतिसाद कमी झाला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाकडून जनजागृत्ती करणे आवश्यक आहे.

राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे. ही योजना सर्वसमावेशक झाल्यानंतर जिल्ह्यातून या योजनेस प्रतिसाद वाढला होता. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या योजनेस प्रतिसाद कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात पूर्व भागासह अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा वाढू लागल्या आहेत. पाणी टंचाई तीव्र होऊ लागल्याने दिवसेंदिवसे टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. संरक्षित पाणीसाठ्यासाठी शेततळे फायदेशीर असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेततळे उभारणे आवश्यक कृषी विभागाने पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे. 

या योजनेतून जिल्ह्यात ५६८५ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये ४४०० अर्ज पात्र; तर १२१२ अर्ज अपात्र ठरले असून, ७३ अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जापैकी ३७९१ अर्जांना मंजुरी देण्यात आली. ३०१४ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे. सध्या ८० शेततळ्यांचे काम सुरू असून, १४८६ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

शेततळ्यांची पूर्ण झालेली कामे  सातारा ९८, कोरेगाव २०४, खटाव २२८, माण ३२०, फलटण २९५, वाई ७७, खंडाळा ९४, महाबळेश्वर १२, जावली १७, पाटण ४१, कऱ्हाड १००.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com