सांगली जिल्ह्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील ७५.३४ कोटी आले

1.5 crore came In the second phase for the Sangli district
1.5 crore came In the second phase for the Sangli district

सांगली : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी पहिल्या हप्ता ३४ कोटी ४८ लाखांचा निधी आला होता. आता दुसऱ्या हप्त्यातील ७५ कोटी ३४ लाखांचा निधी जिल्ह्यासाठी आला आहे. जिल्हा प्रशासनाने ११६ कोटी ८१ लाखांची मागणी शासनाकडे केली आहे. यापैकी १०९ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा होण्यासाठी आणखी आठवडाभर लागेल. शेतकऱ्यांना त्याची प्रतीक्षा कायम आहे. 

जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंबासह इतर पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले. त्यामुळे पिकांचे पंचनामे करण्याचे शासनाने आदेश दिले होते. त्यानुसार पंचनामे झाले. जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार २१२ शेतकऱ्यांचे एक लाख ८ हजार ९९४ हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. गेल्या महिन्यात पंचनाम्याचा अहवाल आणि ११६ कोटी ८१ लाखांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या हफ्त्यापोटी ३४ कोटी ४८ लाख आणि दुसऱ्या हप्प्यापोटी ७५ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे मिळाला. 

तासगाव तालुक्‍यातील ६८ हजार ७४२ शेतकऱ्यांचे ४३ हजार ८२२ हेक्‍टर, खानापुरातील २२ हजार २६५ शेतकऱ्यांचे १८ हजार ३२६, पलूसमधील ५ हजार ५३२ शेतकऱ्यांचे २ हजार ५७ हेक्‍टर, आटपाडीतील १३ हजार १४१ शेतकऱ्यांचे ७ हजार ७८९ हेक्‍टर, कडेगावातील ९ हजार ९९२ शेतकऱ्यांचे ३ हजार १८० हेक्‍टर, शिराळ्यातील ६३२ शेतकऱ्यांचे ९६.२४ हेक्‍टर, वाळवा तालुक्‍यातील ६ हजार ८५७ शेतकऱ्यांचे २ हजार ९३१ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. 

बॅंक खात्यावर जमा होण्याची प्रतीक्षा

मिरज तालुक्‍यातील १७ हजार ५५४ शेतकऱ्यांचे ७ हजार ९३१ हेक्‍टर, जतमधील १५ हजार २६२ शेतकऱ्यांचे ९ हजार ९९० हेक्‍टर, कवठेमहांकाळ तालुक्‍यातील २८ हजार ८१० शेतकऱ्यांचे १७ हजार ३१६ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना मदतनिधी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com