‘महालक्ष्मी सरस’मधून १५ कोटींची उलाढाल

Mahalkshmi saras exhibition
Mahalkshmi saras exhibition

मुंबई: महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून यावर्षी जवळपास १५ कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा या प्रदर्शनाने गाठला, अशी माहिती ग्रामविकास विभागामार्फत देण्यात आली. मुंबईत १७ जानेवारीपासून राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शन बीकेसी येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचा समारोपमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात झाला. त्या वेळी ते बोलत होते. प्रदर्शनात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांना या वेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ``प्रदर्शनास मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून पुढील वर्षी प्रदर्शनात स्टॉलची संख्या वाढविली जाईल. मुंबईकरांनी प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद दिला, यामुळे गावातील महिलांच्या आयुष्यातील गरिबी कमी होण्यास मदत होईल,`` असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.मागील दीड दशकात महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून अंदाजे ८ हजार स्वयंसहाय्यता समूहांनी मुंबईकरांना सेवा दिली आहे. पहिल्यावर्षी ५० लाखांची आर्थिक उलाढाल झाली होती, तर यावर्षी जवळपास १५ कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा या प्रदर्शनाने गाठला आहे. महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटांबरोबर २९ राज्यांमधून विविध उत्पादने, कला घेऊन स्वयंसहाय्यता गट तसेच ग्रामीण कारागीर सहभागी झाले होते. नावीन्यपूर्ण उत्पादने या प्रवर्गात एलइडी बल्ब लाइट गेल्यानंतर सुध्दा चार तास चालू शकतो असा शोध लावणाऱ्या हरिओम स्वयंसहाय्यता गटास गौरविण्यात आले. नव उद्योग प्रवर्गात यशवंती शेतकरी उत्पादक कंपनी, पालघर यांचा गौरव तर सर्वाधिक म्हणजेच ६२ लाख रुपयाचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या बीसी सखीचा गौरव करण्यात आला. तसेच न्युटी व्हिला, उपजीविका हॅब व सेंद्रिय शेतीचे प्रदर्शन मांडणी करणाऱ्या उत्पादक संघ, प्रभागसंघ, ग्रामसंघ व स्वयंसहाय्यता गट, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमास उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला, तारक मेहता का उलटा चष्मामधील कलाकार कोमल भाभी व रोशन सोधी उपस्थित होत्या.  बचगटांना पारितोषिके सर्वाधिक विक्री, उत्पादने (महाराष्ट्र)ः प्रथमः हरीओम स्वयंसहाय्यता गट, जि. लातूर, द्वितीयः वरद विनायक स्वयंसहाय्यता गट, रायगड, तृतीयः विघ्नहर्ता स्वयंसहाय्यता गट  सर्वाधिक विक्री, उत्पादने (इतर राज्य)ः प्रथमः शिल्पयान महिला बचतगट, पश्चिम बंगाल, व्दितीयः रेणु हॅन्डलुम व हॅन्डी क्राफ्ट, मणिपूर, तृतीयः मेखा महिला बचतगट, केरळ सर्वाधिक विक्री, उत्पादने (फूड पॅराडाईज)ः प्रथमः सामकादेवई स्वयंसहाय्यता गट, बीड, द्वितीयः जयलक्ष्मी स्वयंसहाय्यता गट, नागपूर, तृतीयः श्री वैष्णवीदेवी स्वयंसहाय्यता गट, ठाणे उत्कृष्ट सादरीकरण, उत्पादने मांडणीः प्रथमः सांस्कृतिक स्वयंसहाय्यता गट, सातारा, द्वितीयः आस्था स्वयंसहाय्यता गट, अमरावती, तृतीयः नरेंद्रछाया स्वयंसहाय्यता गट, लातूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com