agriculture news in Marathi 15 crores for animal husbandry schemes Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी केंद्राकडून १५ हजार कोटी 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग, संलग्न पशुखाद्य, मांसनिर्मिती, मुरघास उद्योग आणि प्रयोगशाळा उद्योगांसाठी केंद्र सरकारने १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे. 

पुणे ः पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग, संलग्न पशुखाद्य, मांसनिर्मिती, मुरघास उद्योग आणि प्रयोगशाळा उद्योगांसाठी केंद्र सरकारने १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे. या विविध उद्योगांसाठी ९० टक्के कर्ज आणि ३ टक्के व्याज सवलतीची योजना पशुसंवर्धन विभागाद्वारे जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रसाप सिंह यांनी दिली. 

केंद्र शासनाने गेल्या वर्षी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या नवीन योजनेस मंजुरी दिली. मात्र या योजनेचा १५ हजार कोटींची निधी या वर्षी (२०२१-२२) देण्यात आला आहे. या विविध योजनांतर्गत दूध प्रक्रिया (आइस्क्रीम, चीजनिर्मिती, दूध पाश्‍चरायजेशन, दूध पावडर, इत्यादी), मांसनिर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्‍लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना ९० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, व्याज दरामध्ये ३ टक्के सूट देण्यात येणार आहे. 

अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या संकेतस्थळावर (http://dahd.nic.in/ahdf) उपलब्ध आहे. सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर (http://ahd.maharashtra.gov.in) लिंक देण्यात आलेली असून, या योजनेच्या मार्गदर्शक सूचना मराठीत प्रसिद्ध करण्यात येत आहेत. 

विविध उद्योग व्यवसायासोबतच लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रा निर्मिती, बाह्य फलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन याबाबींचा समावेश केलेला आहे. सदर योजनेचा व्यक्तिगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खासगी संस्था, कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी यांना लाभ घेता येईल. 

प्रतिक्रिया
राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाचा पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी उपयुक्त असून, राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. 
- सचिंद्र प्रताप सिंह, पशुसंवर्धन आयुक्त 


इतर अॅग्रो विशेष
‘जंतर-मंतर’वर आजपासून होणार ‘किसान... नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या...
पपईचा हंगाम बहरात; फुलधारणा सुरू जळगाव : खानदेशात पपई पिकाची लागवड यंदा किंचित...
जातीवंत खिल्लार जनावरांच्या किंमतीत घट कोल्हापूर : चपळ असणाऱ्या खिलार बैलांचे संगोपन...
शेतीमालाची सड शोधणाऱ्या उपकरणाची...नाशिक : कांदे, बटाटे, आंबा यांसह विविध फळे व...
कोकणात रविवारपर्यंत जोरदार पाऊस पुणे : कोकणात जवळपास दहा ते बारा दिवसांपासून...
राज्यात सर्वदूर हलक्या सरी पुणे : कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत...
मत्स्योत्पादन सव्वा लाख टनांवररत्नागिरी ः राज्यात गोड्या पाण्यातील...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
राज्यात खरिपाच्या पेरण्या ८३ टक्क्यांवरपुणे  : कोकणाच्या काही भागांत...
जिद्द, चिकाटी, प्रयोगशीलतेतून...नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ते कर्नाटक...
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये...पुणे : कोकणात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धुवाधार...
अकोला कृषी विद्यापीठात ६० टक्के पदे...अकोला ः या जिल्ह्यात कृषी खात्यात कर्मचाऱ्यांची...
पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे...पंढरपूर, जि. सोलापूर : पंढरपुरात पुन्हा एकदा...
निधीअभावी सिंचन विहीर योजनेला खीळ नागपूर : विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १३ हजार...
दूध भेसळीची चर्चा डेअरी उद्योगावर संकट...पुणे ः शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळत असल्याची...
पेरा अंतिम टप्प्यात; कर्जाची प्रतीक्षा...पुणे ः राज्यात खरीप पेरा शेवटच्या टप्प्यात...
वैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...
विदर्भात जोर वाढणार पुणे : मुंबईसह, कोकणातील बहुतांश भागात मुसळधार...
कोकण, मध्य महाराष्ट्रात संततधारपुणे : कोकणातील बहुतांश भागांत पावसाचा कहर सुरू...