Agriculture news in marathi 1.5 lakh hectares of cotton in Parbhani district without crop insurance | Agrowon

परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी पीक विम्याविना

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९ हजार ३२२ हेक्टरवर (१००.४२ टक्के) पेरणी झाली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत शेतकऱ्यांनी ७ लाख १२९ विमा प्रस्ताव दाखल केले.

परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९ हजार ३२२ हेक्टरवर (१००.४२ टक्के) पेरणी झाली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत शेतकऱ्यांनी ७ लाख १२९ विमा प्रस्ताव दाखल केले. त्याद्वारे ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टरवरील पिकांसाठी ३२ कोटी ९० लाख १४ हजार ६२४ रुपये विमा हप्ता भरला. १ हजार ४८५ कोटी ३२ लाख ५ हजार ८५५ रुपयाचे विमा संरक्षण घेतले. सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांच्या पेरणी क्षेत्रापेक्षा विमा संरक्षित क्षेत्र जास्त आहे. तर, कपाशी, तूरीच्या लागवड क्षेत्रापेक्षा विमा संरक्षित कमी आहे. 

यंदा जिल्ह्यातील १ लाख ६६ हजार ७७२ हेक्टरवरील कपाशी आणि ८७९ हेक्टरवरील तूरीला विमा सरंक्षण घेतलेले नाही. खरिप पीकविमा योजने अंतर्गंत गतवर्षी (२०१९-२०) शेतकऱ्यांनी ८ लाख २१ हजार ६८७ विमाप्रस्ताव दाखल करुन ४ लाख ३० हजार ४३५ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते. त्या तुलनेत यंदा १ लाख २१ हजार ५५८ विमा प्रस्ताव कमी दाखल केले आहेत. यंदा ७ हजार ३८० कर्जदार, तर ६ लाख ९२ हजार ७४९ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर केले.

तालुकानिहाय एकूण पेरणीक्षेत्रापेक्षा विमा संरक्षित क्षेत्र कमी आहे. परंतु, पीकनिहाय पेरणी क्षेत्रापेक्षा विमा संरक्षित क्षेत्र जास्त असलेल्या पिकांमध्ये सोयाबीन ३ हजार ३४९ हेक्टर, मूग १५ हजार ३८५ हेक्टर, उडीद १ हजार ४९० हेक्टर, ज्वारी ४ हजार ३३ हेक्टर, बाजरी १ हजार ६५८ हेक्टरने जास्त आहे. पेरणीक्षेत्रापेक्षा विमा संरक्षित क्षेत्र जास्त असलेल्या पिकांचा विमा परतावा मंजूर करताना क्षेत्र सुधार गुणांक लागू शकतो. त्यामुळे प्रतिहेक्टरी परतावा कमी दराने मिळू शकतो.

पिकांच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पीकविमा मोबाईल अॅपव्दारे किंवा रिलायन्स जनरल इन्सूरंन्स कंपनीच्या १८००१०२४०८८, १८००३००२४०८८ या क्रमांकावर कळावावी.

- संतोष आळसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी.


इतर ताज्या घडामोडी
किसान रेल्वेने सांगलीतून हळद जाणार इतर...सांगली ः किसान रेल्वेतून शेतकऱ्यांसह, उद्योग आणि...
वऱ्हाडात पीएम किसानचे साडे तेरा कोटी...अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मदतीस...
चिपळूणात साडेसात हजार शेतकऱ्यांना...रत्नागिरी ः परतीच्या पावसाने चिपळूण तालुक्यातील...
रिसोड बाजारात सोयाबीनची विक्रमी आवकवाशीम ः रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापूर जिल्ह्यात मदतीसाठी ३३५ कोटींची...सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील...
अकोल्यात शेतकरी करणार दोन लाख क्विंटल...अकोला ः गेल्या काही हंगामापासून सोयाबीन...
संत गाडगेबाबा सूतगिरणी सुरू करावी ः...अमरावती : कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील सगळी धरणे तुडूंबपुणे ः चालू वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये...
भंडाऱ्यात ७९ धान खरेदी केंद्रांना मंजुरीभंडारा ः केंद्र सरकारच्या किमान आधारभूत खरेदी...
सोलापूर जिल्ह्यात रास्त भाव दुकानांना...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात ३१ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी...जळगाव ः खानदेशात यंदा गव्हाची पेरणी सुमारे दोन...
परभणी जिल्ह्यात सतरा हजार क्विंटल...परभणी : ‘‘यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी...
शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षातऱ्हाडी, जि. धुळे : वरुणराजाच्या लहरीपणामुळे पिके...
नाशिक जिल्ह्यात लिलाव बंदमुळे शेतकरी...नाशिक : मागील वर्षी हवामान बदल, अवकाळी पाऊस व...
‘कृषी स्वावलंबन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज...परभणी : ‘‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ....
सोयाबीन बियाणे विक्रेत्यांविरुध्द ...अकोला ः यंदाच्या खरिपात सोयाबीन बियाणे उगवले...
शोषणाविरोधात एकवटले संत्रा उत्पादक अमरावती : व्यापाऱ्यांचा शोषणाविरोधात एल्गार...
कांदा साठा मर्यादा वाढविण्याची मागणी नाशिक: कांदा साठा मर्यादा घालून दिल्याने...
दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रेगोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत...
पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड ठरते...द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा...