नाशिक जिल्ह्यात १५ लाख टन चारा उपलब्ध होणार

नाशिक जिल्ह्यात १५ लाख टन चारा उपलब्ध होणार
नाशिक जिल्ह्यात १५ लाख टन चारा उपलब्ध होणार

नाशिक : राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी असेल तेथे चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणकोणत्या भागात चारा छावण्यांची गरज आहे याची पडताळणी करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. नाशिक जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असली तरी चाराटंचाई जाणवणार नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात १५ लाख टन चारा उपलब्ध होईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. ज्या भागात चारा छावण्यांची आवश्यकता आहे त्या भागात पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

नाशिक जिल्ह्यात सुमारे ७ लाख १२ हजार ८५७ गायी, म्हशी आहेत. तर ६ लाख ३० हजार ६७६ शेळ्या, मेंढ्या आहेत. जिल्ह्यात एकूण पशुधन १३ लाख ४३ हजार ५३३ पशुधन आहे. मोठ्या जनावरांना ४२७७.१४२ टन तर प्रतिमहिना १ लाख २८ हजार ३१४ टन चाऱ्याची आवश्यकता आहे. छोट्या जनावरांना प्रतिदिन १८९२.२८ टन तर प्रतिमाह ५६ हजार ७६० टन चाऱ्याची आवश्यकता आहे. सध्याची चाऱ्याची उपलब्धता बघता मे २०१९ पर्यंत पुरेल इतका चारा शिल्लक आहे. तसेच धरणाच्या गाळपेर जमिनीवर वैरण विकास करण्यात येणार असल्याने पुढील चार महिन्यांत आणखी चारा उपलब्ध होईल.

त्यामुळे जिल्ह्यात सुमारे १५ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार असून चारटंचाई जाणवणार नाही, असे प्रशासनाच्या वतीने आढावा बैठकीत सांगण्यात आले. तसेच आपल्या जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात वाहून नेण्याला लगाम घालताना अशा प्रकारची वाहतूक करताना आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी वनविभागाला दिले आहेत.

वैरण विकासासाठी मागवले अर्ज दृष्काळामुळे कोरडे पडलेल्या धरणांच्या जागांवर वैरण विकास प्रकल्प राबविण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १५ हजार हेक्टर चाराटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने यंदा कोरड्या झालेल्या धरण, तलावाच्या जागेत वैरण पीक घेण्याचा आदेश काढला आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान २ हजार हेक्टरवर तरी ज्वारी, बाजरी, मका यांसारखे वैरण पीक घेण्याचा शासनाचा आदेश आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्याने जिल्ह्यातील १५ हजार २७९ हेक्टर एवढे क्षेत्र कोरडे पडले आहे. अशा कोरड्या पडलेल्या क्षेत्रावर शासनाने ज्वारी, बाजरी, मका यांसारखे तत्सम वैरण पीक घेण्याचे आदेश काढले आहेत.

वणवा पेटवल्यास कारवाई डोंगर उतारावर वाळलेले गवत हे पशूंसाठी चारा म्हणून वापरात येते. परंतु अनेकवेळा वन्यजीव पकडण्यासाठी असे वाळलेले गवत पेटवून दिले जाते. मात्र आता असा वणवा पेटवणाऱ्यांवर वनविभागाच्या पथकाकडून वॉच ठेवण्यात येणार असून असे प्रकार करताना आढळून आल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com