नांदेड विभागात १५ लाख २४ हजार टन उसाचे गाळप

नांदेड विभागात १५ लाख २४ हजार टन उसाचे गाळप
नांदेड विभागात १५ लाख २४ हजार टन उसाचे गाळप

नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाअंतर्गत नांदेड विभागातील पाच जिल्ह्यांतील २२ साखर कारखान्यांनी रविवार (ता. २५) पर्यंत १५ लाख २४ हजार ५११ टन उसाचे गाळप केले आहे. एकूण १३ लाख ८२ हजार १४० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून सरासरी ९.०७ टक्के साखर उतारा आला आहे.

नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील एकूण ३५ पैकी ११ सहकारी आणि ११ खासगी असे एकूण २२ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम २१ आॅक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत सुरू झाले. या साखर कारखान्यांची दैनंदिन ऊस गाळप क्षमता १ लाख १७ हजार ५० टन आहे. रविवार (ता. २५) पर्यंत या साखर कारखान्यांनी एकूण १५ लाख २४ हजार ५११ टन उसाचे गाळप केले आहे. एकूण १३ लाख ८२ हजार १४० क्विंटल साखर उत्पादन झाले असून सरासरी ९.०७ टक्के साखर उतारा आला आहे.

परभणी जिल्ह्यातील पाच पैकी तीन खासगी साखर कारखान्यांनी २ लाख ५४ हजार २१५ टन उसाचे गाळप केले आहे. एकूण २ लाख ३९ हजार १३० क्विंटल साखर उत्पादन झाले असून ९.४१ टक्के उतारा आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ४ पैकी ३ सहकारी साखर कारखान्यांनी १ लाख ९ हजार २७० टन उसाचे गाळप केले आहे. एकूण १ लाख १ हजार २७० क्विंटल साखर उत्पादन घेतले असून सरासरी ९.२७ टक्के उतारा आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील ३ सहकारी आणि ३ खासगी साखर कारखान्यांपैकी एका सहकारी साखर कारखान्याने ३१ हजार ५५० टन ऊस गाळप केला आहे. एकूण २५ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन घेतले असून सरासरी ८.१५ टक्के साखर उतारा आला आहे. लातूर जिल्ह्यातील ४ सहकारी आणि ४ खासगी साखर कारखान्यांपैकी ४ सहकारी आणि ३ खासगी असे एकूण ७ साखर कारखान्यांनी ४ लाख ६८ हजार ८२० टन उसाचे गाळप केले आहे. एकूण ४ लाख ३३ हजार २४० क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले असून सरासरी ९.२४ टक्के उतारा आला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ पैकी ३ सहकारी आणि ५ खासगी साखर कारखान्यांनी एकूण ६ लाख ६० हजार ६५६ टन उसाचे गाळप केले आहे. एकूण ५ लाख ८२ हजार ८२० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून सरासरी ८.८२ टक्के साखर उतारा आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com