Agriculture news in marathi 15 percent dividend to the members from the farmers society | Page 2 ||| Agrowon

नाशिक : शेतकरी सोसायटीकडून सभासदांना १५ टक्क्यांचा लाभांश

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात अग्रगण्य शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा १५ टक्के लाभांश वाटपास प्रारंभ झाला.

नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात अग्रगण्य शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा १५ टक्के लाभांश वाटपास प्रारंभ झाला. सोसायटीचे संस्थापक व निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते हे वाटप सुरू करण्यात आले. 

आमदार बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पिंपळगाव बसवत येथील शेतकरी विविध कार्यकारी सोसायटी संस्था स्थापनेपासून १०० टक्के कर्जवसुली करत आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून सहकार क्षेत्र अडचणीत आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. तरीही शेतकरी सोसायटीने यंदाच्या वर्षीही बँक पातळीवर १०० टक्के कर्जे वसुली करत जिल्ह्यात नावलौकीक कायम ठेवला आहे. 

एकीकडे जिल्ह्यातील सहकारी संस्था डबघाईस जात आहेत. तर काही आर्थिक संकटात सापडल्या आहेत. पारदर्शक कामकाजामुळे संस्थेने यशस्वीपणे कामकाज पुढे नेले आहे. 

संस्थेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात १६ लाख ७१ हजार नफा झाला आहे. सालाबादप्रमाणे संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तरतूद केल्याप्रमाणे यंदाही संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे सभापती संपतराव विधाते, उपसभापती शंकरराव बनकर, संचालक बाळासाहेब बनकर, सुरेश खोडे, काशिनाथ विधाते, चंद्रकांत बनकर, घमन खोडे, संजय मोरे आदी उपस्थित होते.
 


इतर बातम्या
पुसदमध्ये ५००० क्विंटल कापसाचीच खरेदीआरेगाव, जि. यवतमाळ : यंदा सुरवातीपासूनच कापसाला...
धुळे : सोयाबीन बीजोत्पादनात सहभाग...धुळे : ‘‘उन्हाळी हंगाम २०२१-२२ मध्ये महाबीज...
नाशिकः २०२४ पर्यंत प्रति दिन,प्रति...नाशिकः ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर नल से जल’...
खानदेशात गहू पेरणीला आला वेग जळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस काहीसे कोरडे...
नांदेड जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकरी...नांदेड : ई-पीक पाहणी प्रकल्पातंर्गत पीक पेरा...
नांदेडमध्ये सोयाबीनला साडेसहा हजारांचा...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
तुर्कांबाद खराडीत करारावर बटाटा...औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील...
शेतकऱ्यांनो एकरकमी भरा अर्धेच वीजबिल ः...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण...
राज्याच्या किमान तापमानात घट पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश...
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे -...लातूर ः आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची...
शिंदीच्या झाडांचे आता जिओ टॅगिंग  नीरा...नागपूर ः राज्य शासनाने नीरा देणाऱ्या शिंदीच्या...
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...
काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे अमरिश...मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा...
नाशिकमध्ये द्राक्ष परिषद घेणार : राजू...नाशिक : द्राक्ष पिकात शेतकरी कष्टातून उत्पादन घेत...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का कमीचनगर ः जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला अजूनही फारसा...
ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या...
किन्ही येथे धान पुंजणे जाळल्याने आठ...भंडारा ः साकोली तालुक्‍यातील किन्ही येथे १९...
पालघरचा मंजूर विकासनिधी सातव्यांदा...पालघरः मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याच्या...