agriculture news in marathi, 15 thousand quintal registered tur pending in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात नोंदणीकृत १५ हजार क्विंटल तूर खरेदी शिल्लक
टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 मे 2018

जळगाव : जिल्ह्यात तूर शिल्लक असताना तूर खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होणार आहे. शासकीय तूर खरेदी बंद झाल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांना खासगी बाजारात तूर विक्री करावी लागेल. शासकीय केंद्रात तूूर विक्रीसंबंधी नोंदणी केलेल्या सुमारे दोन हजार शेतकऱ्यांची १५ हजार किंवटल तूर पडून आहे. 

जळगाव : जिल्ह्यात तूर शिल्लक असताना तूर खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होणार आहे. शासकीय तूर खरेदी बंद झाल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांना खासगी बाजारात तूर विक्री करावी लागेल. शासकीय केंद्रात तूूर विक्रीसंबंधी नोंदणी केलेल्या सुमारे दोन हजार शेतकऱ्यांची १५ हजार किंवटल तूर पडून आहे. 

तूर खरेदीसंबंधी जिल्ह्यात नऊ केंद्रे सुरू होते, परंतु यातील अमळनेर, भडगाव, चाळीसगाव व जळगाव येथील केंद्र रखडतच सुरू होते. अमळनेर केंद्र अनेकदा बंद असायचे. तर जळगाव येथील केंद्रातही दुपारी केंद्र बंद केले जायचे. मध्यंतरी जळगाव केंद्रात धान्य खरेदीवरून शेतकरी व कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. केंद्र बंद करून कर्मचारी निघून गेल्याने शेतकऱ्यांनी शेतकी संघाचे संचालक व वरिष्ठांकडे तक्रार केली होती. 
त्यानंतर खरेदी सुरू झाली. रखडत तूर खरेदी सुरू असल्याने तूर शिल्लक राहिली. मुक्ताईनगर, बोदवड, रावेर व जामनेर भागात तूर अधिक शिल्लक आहे. तसेच बिगर नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या तुरीलाही शासकीय खरेदी बंद झाल्याने खासगी बाजारात व्यापारी कमी दर देतील, अशी भीती आहे. कारण शासकीय केंद्रात ५४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर तुरीला होता. तर खासगी बाजारात ४८०० रुपयांपर्यंतचे दर शेतकऱ्यांना व्यापारी देत असल्याचे सांगण्यात आले.

 बोदवडमध्ये शासकीय तूर खरेदी पुन्हा सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे. कारण बाजारात आयात तुरीचे प्रमाण वाढून पुढे आणखी दरांवर परिणाम होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात अमळनेर व चोपडा येथील बाजारात तुरीची आवक पुढे वाढू शकते, असे सांगण्यात आले. 

तूर खरेदीसंबंधी नवे आदेश नाहीत. ज्यांनी नोंदणी केली होती, त्यातील दीड हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी राहिली आहे. आदेश आल्यानंतर तूर खरेदी सुरू होईल. 
- परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...