जायकवाडीत २४ तासात आले दीड टीएमसी पाणी 

जायकवाडीत २४ तासात आले दीड टीएमसी पाणी 
जायकवाडीत २४ तासात आले दीड टीएमसी पाणी 

औरंगाबाद : मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या जायकवाडी प्रकल्पात ऊर्ध्व भागातील प्रकल्पांमधून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे गत चोवीस तासात जायकवाडी प्रकल्पात जवळपास १.८२ टीएमसी पाणी आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे नगर, नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व भागातील प्रकल्पाच्या विसर्गावरच जायकवाडीची तहान भागणे अवलंबून आहे. मंगळवारी(ता.३०) सकाळी १० वाचेपर्यंतच्या माहितीनुसार जायकवाडी प्रकल्पाच्या दिशेने ऊर्ध्व भागातील नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून ५८ हजार क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यापाठोपाठ दारणा प्रकल्पातून १३ हजार ५८ क्‍युसेक, गंगापूरमधून ७८३३ क्‍युसेक, पालखेडमधून ६०७ क्‍युसेक, कडवा प्रकल्पातून २७१८ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. नागमठाणमधून ३२ हजार ३०७ क्‍युसेकने सुरू असलेला पाण्याचा विसर्ग नदीपात्रातील पाण्याचा पातळीत वाढ करून गेला.  दारणा ते जायकवाडी गोदावरीच्या पाण्याचा प्रवास.. पहा video

सकाळी ८ वाजताच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पात १४७३० क्‍युसकने पाण्याची आवक सुरू होती. आजवर आवक झालेल्या पाण्यामुळे जायकवाडी प्रकल्पातील एकूण पाणीसाठा मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास जवळपास २१.६१ टीएमसीच्या आसपास पोहोचला होता. तर दुपारी १२ वाजताच्या सुमारास फुटामध्ये १४९१.८१ फूट असलेली प्रकल्पाची पाणी पातळी मीटरमध्ये ४५४.७०४ मीटरवर पोहोचली होती. दुपारी १२ वाजताच्या सुमारास जायकवाडीतील एकूण पाणीसाठा ६२५.५०० दलघमीवर (२२.०८ टीएमसीवर)पोहचला होता. तर सकाळी १० वाजेदरम्यान १४ हजार ७३० क्‍युसेकने प्रकल्पात प्रत्यक्ष सुरू असलेली आवक वाढून ती २५५७१ क्‍युसेकवर पोहोचली होती. 

अजूनही मृत साठ्यात असलेल्या जायकवाडी प्रकल्पाच्या दिशेने ऊर्ध्व भागातील पाण्याचा विसर्ग असाच सुरू राहिल्यास जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने वाढत राहिली अशी आशा आहे. सोमवारी(ता.२९) सकाळी ८ ते मंगळवारी(ता.३०) सकाळी ८ वाजेदरम्यानच्या चोवीस तासात जायकवाडी प्रकल्पात जवळपास ५१.६१ दलघमी पाणी दाखल झाल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद - नगर जिल्ह्याच्या सीमेलगत कायगाव टोका येथून गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहताना दिसले. नदीपात्रातील वाढत असलेले पाणी पाहता जीवरक्षक दलाच्यावतीने कायगाव टोका येथे खबरदारी म्हणून होडी, डीग्‌गीची व्यवस्था करण्यात आली होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com