मुंबईतून सिंधुदुर्गात आलेली १५ वर्षीय मुलगी कोरोनाबाधित 

सिंधुदुर्ग ः लॉकडाऊन काळात मुंबईतून सिंधुदुर्गातील सोनवडे (ता. कुडाळ) गावात आलेल्या १५ वर्षीय मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तिला तत्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रशासनाने सोनवडे गावापासून तीन किलोमीटरचा परिसर बंद केला आहे. कोरोनामुक्त जिल्ह्यात पुन्हा रूग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणा आणखीनच सतर्क झाली आहे.
A 15-year-old girl from Mumbai came to Sindhudurg

लॉकडाऊन कालावधीत २० एप्रिलला मुंबईतून सिंधुदुर्गातील सोनवडे गावात एक कुटुंब आले होते. त्यांना प्रशासनाने होम क्वारंटाइन केले होते. आई-वडील आणि एक मुलगी असे घरी राहत होते. दरम्यान तिघांचे नुमने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल मंगळवारी (२८) रात्री उशिरा प्रशासनाकडे प्राप्त झाला. त्यातील १५ वर्षीय मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, आई-वडिलांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासनाने तत्काळ त्या मुलीला उपचाराकरिता जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. सध्या तिला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. 

जिल्ह्यात पुन्हा एक कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची ताराबंळ उडाली आहे. प्रशासनाने कुडाळ तालुक्यातील सोनवडे गावापासून तीन किलोमीटरचा परिसर बंद केला. या भागात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सध्या आँरेज झोनमध्ये होता. मार्चमध्ये मेंगलोर एक्सप्रेसमधून प्रवास केलेल्या जिल्ह्यातील एकाला कोरोनाची लागण झाली होती. उपचाराअंती तो रूग्ण बरा झाला होता. त्याचे तीन रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानतंर त्याला घरी सोडले होते. त्यानतंर गेली ३३ दिवस जिल्ह्यात एकही रूग्ण सापडला नव्हता. त्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये दाखल होण्याची शक्यता होती. परंतु पुन्हा रूग्ण सापडल्यामुळे आता ग्रीन झोनची शक्यता मावळली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com