Agriculture news in Marathi, 150 crore project approved for research, development of agricultural universities. Bonde | Agrowon

कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी १५० कोटींच्या प्रकल्पाला मान्यता ः डॉ. बोंडे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी प्रतिवर्षी ५० कोटी प्रमाणे ३ वर्षांसाठी प्रति विद्यापीठ १५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून, त्याबाबतचा प्रस्ताव सर्व कृषी विद्यापीठांमार्फत कृषी परिषदेला पाठविण्यात यावा, असे निर्देश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले. मंत्रालयात मंगळवारी कृषी परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. 

मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी प्रतिवर्षी ५० कोटी प्रमाणे ३ वर्षांसाठी प्रति विद्यापीठ १५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून, त्याबाबतचा प्रस्ताव सर्व कृषी विद्यापीठांमार्फत कृषी परिषदेला पाठविण्यात यावा, असे निर्देश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले. मंत्रालयात मंगळवारी कृषी परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. 

कृषिमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजनांसोबतच कृषी संशोधनावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक कृषी विद्यापीठाला तीन वर्षांसाठी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. इथेनॉल उत्पादनासोबतच जनावरांना चांगले खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ वैरण पिकावर संशोधन करणार आहे. या संशोधनासाठी १ कोटी २३ लाख रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून, नागपूर जिल्ह्यातील कृषी तंत्र विद्यालय सावंगी येथे वैरण संशोधन व विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. 

त्याचबरोबर जैव ऊर्जा (बायो एनर्जी) उत्पादनामार्फत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी चारा पिकातील नेपिअर ग्रासवर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संशोधन करणार असल्याचेही कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी या वेळी सांगितले.

बैठकीस, कृषी परिषदेचे महासंचालक विश्‍वजित माने, संचालक विठ्ठल शिर्के, कृषी संशोधन परिषदेचे संचालक (शिक्षण) डॉ. हरिहर कौसडीकर, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा तसेच कृषी परिषद, कृषी विद्यापीठ व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...
अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना...अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस...