परभणीत शेवग्याला प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये

परभणीत शेवग्याला प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये
परभणीत शेवग्याला प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ३) शेवग्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते ३००० दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये दर मिळाले. शेपूची १५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. मेथीच्या २ हजार जुड्यांची आवक झाली. तिला प्रतिशेकडा ८०० ते १००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ६० क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये, गवारीची १५ क्विंटल आवक, तर दर १२०० ते २००० रुपये, चवळीची ५ क्विंटल आवक, तर दर २५०० ते ४००० रुपये, वांग्याची ३५ क्विंटल आवक, तर दर १००० ते २००० रुपये, टोमॅटोची ३५० क्विंटल आवक, तर दर २००० ते २५०० रुपये मिळाले. 

हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ५ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये, भेंडीची २० क्विंटल आवक, तर दर १२०० ते २००० रुपये, फ्लॅावरची ७ क्विंटल आवक, तर दर ३५०० ते ५००० रुपये, कोबीची २५ क्विंटल आवक, तर दर १००० ते १५०० रुपये मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ५ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये दर मिळाले. दोडक्याची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. काकडीची ३० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले.

कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रुटची ४ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. कैरीची २०० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. लिंबांची १५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com