Agriculture news in Marathi, 1500 hectares of area deprived of Panchanama | Agrowon

पुणे : पंचनाम्यापासून अद्यापही १५ हजार हेक्टर क्षेत्र वंचित

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

पुणे ः पुणे जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे धीम्या गतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नसून सुमारे १५ हजार २२ हेक्टर क्षेत्र पंचनाम्यापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे पंचनामे कधी पूर्ण होतील, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

पुणे ः पुणे जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे धीम्या गतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नसून सुमारे १५ हजार २२ हेक्टर क्षेत्र पंचनाम्यापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे पंचनामे कधी पूर्ण होतील, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

पुणे जिल्ह्यात जोरदार पावसामुळे भात, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, फळे, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात गावपातळीवर तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांचे कामाचे स्वरूप व रिक्त असलेल्या जागा विचारात घेता जिल्ह्यात नुकसानीचे धीम्या गतीने पंचनामे सुरू आहेत. आत्तापर्यंत (ता. ९) जिल्ह्यात ८३ हजार ७०५ हेक्टरवर पंचनामे झाले आहेत.

यंदा पुणे जिल्ह्यात सुमारे तीन लाख ६ हजार ६८३ हेक्टरवर पेरणी झाली होती. ऐन काढणीच्या अवस्थेत असताना जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे एक हजार ४५४ गावांतील सुमारे एक लाख ५८ हजार ९६९ शेतकऱ्यांना फटका बसला असून, या गावातील पंचनामे तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार तातडीने पंचनामे सुरू केले असले, तरी अनेक भागांत अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत.

पावसाचा सर्वाधिक फटका जुन्नर तालुक्याला बसला आहे. सुमारे १८४ गावांतील ५६ हजार ५२३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात जवळपास ३५ हजार ५८५ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यापैकी २७ हजार ५१३ हेक्टरचे पंचनामे झाले आहेत. उर्वरित शिरूर, खेड, मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर या तालुक्यांतही पंचनामे वेगाने सुरू असून, येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा कृषी विभागाच्या प्रशासनाला आहे.पुरंदर तालुक्यात सर्वाधिक पंचनामे करण्याचे राहिले आहेत.

पंचनाम्यापासून दूर राहिलेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका क्षेत्र
हवेली ७०२.४४
मुळशी ५६.९९
भोर ६९.३६
मावळ १३४३.५६
वेल्हा १६७.१०
खेड २१०२.१५
आंबेगाव ३३०६.१८
शिरूर ४१९.८८
बारामती ७२१.९५
इंदापूर ८०६.४१
दौंड २२७१.६०
पुरंदर ३०५५.१२
एकूण १५०२२

जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्यानंतर तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. आत्तापर्यंत ८० ते ९० टक्के पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले. उर्वरित पिकांचेही पंचनामे आठवडाभरात पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.  
- बी. जे. पलघडमल, 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे
 


इतर ताज्या घडामोडी
मधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर....‌अंबाजोगाई : ‘‘शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या जाती...
परभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...
सोलापूर : कांदा लिलाव बंद पाडण्याचा डाव...सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही...
कोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि...
विज्ञान, अध्यात्माच्या ताकदीने देश विश्...कुंडल, जि. सांगली :  ज्ञान, विज्ञान, संगणक व...
संत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज...अमरावती  ः सांघिक तत्त्वावर संत्रा...
फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत नाराजांची...मुंबई ः भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की...
कृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम...नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी...
फडणवीस सरकारची ३१० कोटींची हमी रद्द...मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र...
आचारसंहितेपूर्वीच्या निर्णयांची...मुंबई ः विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू...
पुणे जिल्ह्यात भातकाढणी अंतिम टप्प्यातपुणे ः पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी...
पश्‍चिम महाराष्ट्रात...पुणे ः पश्‍चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि...
सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना...कऱ्हाड, जि. सातारा ः राजकीय पक्षांचा आदर्श घेऊन...
नगर जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर सात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आता रोजगार हमी योजनेच्या...
चंद्रशेखर भडसावळे यांना मार्टचा ‘फादर...खडकवासला, जि. पुणे : कृषी पर्यटन संकल्पनेचे...
देशी कापूस संशोधन केंद्राचा उद्या...परभणी: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या...
गांडूळखत अर्क निर्मितीसेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गाडूळखताचे मोठे...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरचमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१...
केंद्राने कांदा साठवणूक मर्यादा ५०...नाशिक : गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस...