Agriculture news in Marathi, 1500 hectares of area deprived of Panchanama | Page 2 ||| Agrowon

पुणे : पंचनाम्यापासून अद्यापही १५ हजार हेक्टर क्षेत्र वंचित

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

पुणे ः पुणे जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे धीम्या गतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नसून सुमारे १५ हजार २२ हेक्टर क्षेत्र पंचनाम्यापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे पंचनामे कधी पूर्ण होतील, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

पुणे ः पुणे जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे धीम्या गतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नसून सुमारे १५ हजार २२ हेक्टर क्षेत्र पंचनाम्यापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे पंचनामे कधी पूर्ण होतील, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

पुणे जिल्ह्यात जोरदार पावसामुळे भात, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, फळे, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात गावपातळीवर तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांचे कामाचे स्वरूप व रिक्त असलेल्या जागा विचारात घेता जिल्ह्यात नुकसानीचे धीम्या गतीने पंचनामे सुरू आहेत. आत्तापर्यंत (ता. ९) जिल्ह्यात ८३ हजार ७०५ हेक्टरवर पंचनामे झाले आहेत.

यंदा पुणे जिल्ह्यात सुमारे तीन लाख ६ हजार ६८३ हेक्टरवर पेरणी झाली होती. ऐन काढणीच्या अवस्थेत असताना जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे एक हजार ४५४ गावांतील सुमारे एक लाख ५८ हजार ९६९ शेतकऱ्यांना फटका बसला असून, या गावातील पंचनामे तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार तातडीने पंचनामे सुरू केले असले, तरी अनेक भागांत अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत.

पावसाचा सर्वाधिक फटका जुन्नर तालुक्याला बसला आहे. सुमारे १८४ गावांतील ५६ हजार ५२३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात जवळपास ३५ हजार ५८५ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यापैकी २७ हजार ५१३ हेक्टरचे पंचनामे झाले आहेत. उर्वरित शिरूर, खेड, मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर या तालुक्यांतही पंचनामे वेगाने सुरू असून, येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा कृषी विभागाच्या प्रशासनाला आहे.पुरंदर तालुक्यात सर्वाधिक पंचनामे करण्याचे राहिले आहेत.

पंचनाम्यापासून दूर राहिलेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका क्षेत्र
हवेली ७०२.४४
मुळशी ५६.९९
भोर ६९.३६
मावळ १३४३.५६
वेल्हा १६७.१०
खेड २१०२.१५
आंबेगाव ३३०६.१८
शिरूर ४१९.८८
बारामती ७२१.९५
इंदापूर ८०६.४१
दौंड २२७१.६०
पुरंदर ३०५५.१२
एकूण १५०२२

जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्यानंतर तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. आत्तापर्यंत ८० ते ९० टक्के पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले. उर्वरित पिकांचेही पंचनामे आठवडाभरात पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.  
- बी. जे. पलघडमल, 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे
 


इतर ताज्या घडामोडी
१ डॉक्‍टर अन्‌ १६ हजार जनावरे !इस्लामपूर, जि. सांगली : वाळवा तालुक्‍यात राज्य...
एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून...नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक...
रत्नागिरीत वाऱ्यांसह ढगाळ वातावरण;...रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
पाणी शुद्धीकरणासाठी नॅनो...अधिक पाण्यावर गाळण यंत्रणा या तुलनेने सावकाश आणि...
ढगाळ हवामानामुळे फळबाग उत्पादक धास्तावलेपुणे ः आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने...
परभणी : दोन हजारांवर शेतकऱ्यांना...परभणी  : मुख्यमंत्री सौर कृषिपंप...
औरंगाबाद विभागात १६ कारखान्यांना गाळप...औरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील १९ साखर...
बदलत्या हवामानामुळे पिकांवरील परिणामाचा...सोलापूर ः सातत्याने बदलणारे हवामान आणि त्याचा...
पुणे जिल्ह्यात कांदा रोपांच्या दरात वाढपुणे  ः वाढलेल्या कांदा दरामुळे पुणे...
मधुक्रांती प्रदर्शनास उद्यापासून प्रारंभनाशिक  : मधमाशीपालन या विषयावरील ‘मधुक्रांती...
गायी, म्हशींचे कृत्रिम रेतन करताना...पुणे  : गाय, म्हशीला कृत्रिम रेतन करताना...
कलम केलेल्या द्राक्ष बागेमध्ये करावयाची...द्राक्ष बागेमध्ये सध्या वाढीच्या विविध...
जामखेड पालिकेने बाजार समितीला ठोकले टाळेजामखेड, जि. नगर ः नगरपरिषदेने कृषी उत्पन्न बाजार...
सातारा जिल्ह्यात ३१ हजार क्विंटल बियाणे...सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ३५ हजार ९१२...
जळगावात भरताची वांगी १८०० ते ३५०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४...
एकात्मिक सेंद्रिय रासायनिक नियोजनाची...पन्नास वर्षांपूर्वी अन्नधान्यासाठी आयातीवर...
शेखर गायकवाड प्रभारी कृषी आयुक्तपुणे  : राज्यात ओला दुष्काळ, पीकविमा, रब्बी...
इथेनॉलनिर्मिती, मिश्रणासाठी बनवले नवे...वाहनातून होणाऱ्या कर्ब उत्सर्जनाचे प्रमाण कमी...
परभणी जिल्ह्यात पणन महासंघातर्फे दोन...परभणी : ‘‘महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
पगारासाठी ‘आदिनाथ’च्या कामगारांचे आंदोलनकरमाळा, जि. सोलापूर : करमाळा येथील श्री आदिनाथ...