151 bags of wheat and rice seized in Barshi
151 bags of wheat and rice seized in Barshi

बार्शीत रेशनचा १५१ पोती गहू, तांदूळ जप्त

सोलापूरः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील काळदाते ट्रेडिंग कंपनी या अडत दुकानावर छापा टाकला. पोलिसांनी रेशन दुकानातून विक्रीसाठी आलेला एक लाख १३ हजार रुपये किमतीचा सुमारे साडेसात टन गहू व तांदूळ (१५१ पोती) जप्त केला.

सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील काळदाते ट्रेडिंग कंपनी या अडत दुकानावर छापा टाकला. पोलिसांनी रेशन दुकानातून विक्रीसाठी आलेला एक लाख १३ हजार रुपये किमतीचा सुमारे साडेसात टन गहू व तांदूळ (१५१ पोती) जप्त केला. बुधवारी (ता.५) ही कारवाई झाली. या प्रकरणी जीवन उद्धवराव काळदाते (रा. दत्तनगर, बार्शी) व ज्ञानेश्वर पवार यांच्याविरुध्द बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

बार्शीतील रेशनचे तांदूळ गेल्याच आठवड्यात पनवलेमध्ये जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आठवड्यातील अशाच प्रकारची ही दुसरी घटना आहे. पोलिस कर्मचारी संदेश पवार यांनी फिर्याद दिली आहे. दोन्ही संशयित आरोपींना अटक झाली असून, त्यांना ११ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बाजार समितीतील काळदाते ट्रेडिंग कंपनी (प्लॉट नं. १९३ अ) या आडत दुकानात रेशनचे गहू व तांदूळ विक्रीसाठी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांच्यासह हवालदार वरपे, पोलिस नाईक भांगे, पोलिस कॉन्स्टेबल लगदिवे, बागल यांच्या पथकाने ही धाड टाकली. दुकानमालक जीवन काळदाते हे तेथे उपस्थित होते. पोलिसांनी कोपऱ्यात ठेवलेल्या धान्याबाबत चौकशी केली असता काळदाते याने ते तांदूळ व गहू असल्याचे सांगितले. उस्मानाबाद येथील ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील रेशनची ७६ पोती तांदूळ आणि ७५ पोती गहू विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशीअंती हा गुन्हा दाखल केला.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com