Agriculture news in marathi 151 bags of wheat and rice seized in Barshi | Page 2 ||| Agrowon

बार्शीत रेशनचा १५१ पोती गहू, तांदूळ जप्त

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील काळदाते ट्रेडिंग कंपनी या अडत दुकानावर छापा टाकला. पोलिसांनी रेशन दुकानातून विक्रीसाठी आलेला एक लाख १३ हजार रुपये किमतीचा सुमारे साडेसात टन गहू व तांदूळ (१५१ पोती) जप्त केला.

सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील काळदाते ट्रेडिंग कंपनी या अडत दुकानावर छापा टाकला. पोलिसांनी रेशन दुकानातून विक्रीसाठी आलेला एक लाख १३ हजार रुपये किमतीचा सुमारे साडेसात टन गहू व तांदूळ (१५१ पोती) जप्त केला. बुधवारी (ता.५) ही कारवाई झाली. या प्रकरणी जीवन उद्धवराव काळदाते (रा. दत्तनगर, बार्शी) व ज्ञानेश्वर पवार यांच्याविरुध्द बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

बार्शीतील रेशनचे तांदूळ गेल्याच आठवड्यात पनवलेमध्ये जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आठवड्यातील अशाच प्रकारची ही दुसरी घटना आहे. पोलिस कर्मचारी संदेश पवार यांनी फिर्याद दिली आहे. दोन्ही संशयित आरोपींना अटक झाली असून, त्यांना ११ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बाजार समितीतील काळदाते ट्रेडिंग कंपनी (प्लॉट नं. १९३ अ) या आडत दुकानात रेशनचे गहू व तांदूळ विक्रीसाठी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांच्यासह हवालदार वरपे, पोलिस नाईक भांगे, पोलिस कॉन्स्टेबल लगदिवे, बागल यांच्या पथकाने ही धाड टाकली. दुकानमालक जीवन काळदाते हे तेथे उपस्थित होते. पोलिसांनी कोपऱ्यात ठेवलेल्या धान्याबाबत चौकशी केली असता काळदाते याने ते तांदूळ व गहू असल्याचे सांगितले. उस्मानाबाद येथील ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील रेशनची ७६ पोती तांदूळ आणि ७५ पोती गहू विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशीअंती हा गुन्हा दाखल केला. 
 
 


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...