कुंभमेळ्यासाठी प्रयागराज सज्ज

कुंभमेळ्यासाठी प्रयागराज सज्ज
कुंभमेळ्यासाठी प्रयागराज सज्ज

नवी दिल्ली : पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या प्रयागराज कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने जय्यत तयारी केली असून, त्यासाठी एक तात्पुरत्या शहराची उभारणी केली आहे. या शहराचा आकार पाहता ते जगातील बहुधा सर्वाधिक मोठे तात्पुरते शहर असणार आहे. मानवतेचा सांस्कृतिक ठेवा म्हणून गौरविलेल्या कुंभमेळ्याला बारा कोटी नागरिक भेट देण्याची शक्‍यता आहे. विदेशातूनही पाच हजार अनिवासी भारतीय येथे येतील, अशी राज्य सरकारला आशा आहे. काही दिवसांपूर्वी ७१ देशांच्या राजदूतांनी कुंभमेळ्याच्या तयारीची पाहणी केली असून, प्रत्यक्ष कुंभमेळा सुरू झाल्यावर १९२ देशांचे प्रतिनिधीही भेट देतील, यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. कुंभमेळ्याचे आयोजन त्रिवेणी संगमावर केले असले तरी यामध्ये सर्व प्रयागराज शहर सहभागी असणार आहे. त्यामुळेच राज्य सरकारने कुंभमेळ्याशी संबंधित प्रत्येक ठिकाण शोभिवंत केले आहे. तसेच, गेल्या साडेचारशे वर्षांमध्ये प्रथमच कुंभमेळ्याला भेट देणाऱ्या भाविकांना 'अक्षय वट' आणि 'सरस्वती कूप' येथे प्रार्थना करता येणार आहे. कुंभमेळ्याला येऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी प्रथमच रस्ते आणि हवाई वाहतुकीबरोबरच जलवाहतुकीचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कुंभमेळ्यामध्ये सुरक्षा व्यवस्थाही मजबूत ठेवली असून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. यंदाच्या कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने २८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शिवाय, या निमित्ताने शाश्‍वत विकासाची कामे करण्यासाठीही ४३०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. २०१३ ला येथे झालेल्या कुंभमेळ्यासाठी १२१४ कोटी रुपये खर्च आला होता. यंदाच्या कुंभमेळ्याची वैशिष्ट्ये

  •  २५० किमी : लांबीचे रस्ते
  •  २२ : तात्पुरते पूल
  •  ४० हजार : एलईडी दिवे
  •  १२ कोटी : भाविक येण्याची अपेक्षा
  •  ७१०० कोटी रुपये : एकूण अपेक्षित खर्च
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com