agriculture news in marathi 16 applications rejected in scrutiny of Board of Directors election | Agrowon

परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत छाननीत १६ अर्ज बाद

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल केलेले ८५ अर्ज वैध, तर १६ अर्ज छाननी दरम्यान बाद झाले आहेत. 

परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल केलेले ८५ अर्ज वैध, तर १६ अर्ज छाननी दरम्यान बाद झाले आहेत. 

जिंतूर आणि पाथरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष मतदारसंघातून प्रत्येकी एक अर्ज आला. त्यामुळे या दोन जागांवर अनुक्रमे रामप्रसाद बोर्डीकर आणि बाबाजानी दुर्राणी यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित १९ जागांसाठीच्या लढतीचे चित्र माघारीनंतरच स्पष्ट होईल.

संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी १५४ उमेदवारी अर्ज दाखल होते. या अर्जाची मंगळवारी (ता.२३) छाननी करण्यात आली. बुधवारी (ता.२४) वैध आणि अवैध उमेदवारी अर्जाची यादी निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी प्रसिद्ध केली. 

जिंतूर मतदारसंघातून बोर्डीकर यांचा, तर  पाथरी मतदारसंघात दुर्राणी यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे  त्यांची बिनविरोध निवड झाली. अन्य प्रमुख उमेदवारांमध्ये परभणी विविध कार्यकारी मतदारसंघात आमदार  सुरेश वरपुडकर, दत्ता गोंधळकर, सेलू मतदारसंघात आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर, वर्षा लहाने, मानवत मतदारसंघात जिल्हा बॅंकेचे  विद्यमान अध्यक्ष पंडितराव चोखट, गंगाधर कदम, सोनपेठमध्ये राजेश विटेकर, गंगाधर कदम आहे.

याशिवाय गंगाखेडमध्ये भगवान सानप, सुभाष ठवरे, पालममधून गणेशराव रोकडे, लक्ष्मण दुधाटे, पूर्णा बालाजी देसाई, पांडुरंग डाखोरे, हिंगोलीत आमदार तानाजी मुटकुळे, दत्तराव जाधव, सेनगावात रूपाली पाटील, साहेबराव पाटील, वसमतमध्ये आमदार चंद्रकांत नवघरे, अंबादास भोसले, कळमनुरीत माजी खासदार  शिवाजी माने, सुरेश वडगावकर, औंढा नागनाथमध्ये गयबाराव नाईक, राजेश पाटील, कृषी पणनमध्ये भावना कदम, सुरेश देशमुख, बालासाहेब नीरस, सुशिल देशमुख यांचा समावेश आहे.


इतर ताज्या घडामोडी
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...
दुर्लक्षित पिकांनाही येत्या काळात संधीद्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा ही राज्याच्या...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...