agriculture news in Marathi, 16 candidate declare of Baliraja, Maharashtra | Agrowon

‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मार्च 2019

कोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच शेतीचे प्रश्‍न जैसे थे आहेत. शेतकऱ्यांसह इतर प्रश्‍नांसाठी बळिराजा पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणूक लढविली जाणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष दिगंबर लोहार यांनी दिली.
 

कोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच शेतीचे प्रश्‍न जैसे थे आहेत. शेतकऱ्यांसह इतर प्रश्‍नांसाठी बळिराजा पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणूक लढविली जाणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष दिगंबर लोहार यांनी दिली.
 

दरम्यान, पक्षातर्फे कोल्हापुरातून किसन काटकर व हातकणंगलेतून बी. जी. पाटील रिंगणात उतरणार आहेत.  सुरेश पाटील यांच्या मराठा क्रांती सेनेच्या वतीनेही यापैकी काही उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची घोषणा इचलकरंजीत केली होती. याबाबत पत्रकारांना विचारले असता त्यांचे आणि आमचे बोलणे झाले आहे. त्यानुसार जाहीर केलेले उमेदवार आमच्याच एमबी फॉर्मवर निवडणूक लढविणार असल्याचे लोहार यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर प्रेस क्‍लब येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 

लोहार म्हणाले, सध्या शेतीचे मोठे प्रश्‍न आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चानुसार दर मिळत नाहीत. त्यामुळे, चांगले आणि अभ्यासू लोक संसदेत जाणे अपेक्षित आहे. नागरिकांच्या संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी बळिराजा पक्ष लोकसभेची निवडणूक लढविणार आहे. संपर्कप्रमुख शिवाजी माळकर, यशवंत महाडिक, किसन काटकर, दत्तात्रेय सुतार उपस्थित होते. 

उमेदवार असे 
पंजाबराव पाटील (सातारा), संजय पाटील (माढा), गणेश जगताप (बारामती), मोहन घारे (शिरूर), संभाजी गुणहाट (मावळ), पवन हिरे (शिर्डी), संजय पाशीलकर (रायगड), अरुण कनोरे (मुंबई उत्तरपूर्व), खुशबू बेलेकर (नागरपूर), ॲड. शीला ढगे (वर्धा), नंद नरोटे (गडचिरोली), डॉ. धनंजय नालट (अकोला), संजय देशमुख (बुलढाणा) व संजय टेंबरे (भंडारा-गोंदिया).

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...