साडेसोळा लाख क्विंटल कापूस खरेदी

कापूस खरेदी
कापूस खरेदी

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-१९ च्या खरेदी हंगामामध्ये सोमवार (ता. १) पर्यंत भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि खासगी व्यापारी यांच्यातर्फे एकूण १६ लाख ५२ हजार ५१५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला खुल्या बाजारात हमीदरापेक्षा जास्त दर मिळाले. त्यामुळे यंदा राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची कापूस खरेदी होऊ शकली नाही. कापसाच्या दरात सुधारणा झाली असून, प्रतिक्विंटलचे दर ६ हजार रुपयांच्या वर पोचले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये सीसीआयच्या केंद्रांवर एकूण १३ हजार ८०५ क्विंटल कापूस खेरदी झाली. तर खासगी व्यापाऱ्यांनी एकूण ४ लाख ६५ हजार ८ क्विंटल कापूस खरेदी केली. नांदेड जिल्ह्यात सीसीआय आणि खासगी व्यापारी यांची मिळून एकूण ४ लाख ७८ हजार ८१३ क्विंटल कापूस खरेदी झाली.  परभणी जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मार्च अखेर एकूण ११ लाख ४ हजार ४६६ क्विंटल कापूस खरेदी झाली. यामध्ये भारतीय कापूस महामंडळाची(सीसीआय) ३२ हजार ५६६ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. खासगी व्यापाऱ्यांतर्फे १० लाख ७१ हजार ९०० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. खुल्या बाजारात कापसाची प्रतिक्विंटल ५ हजार २५० ते ६ हजार १०० रुपये दराने खरेदी करण्यात आली.  हिंगोली जिल्ह्यातील ७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एकूण ६९ हजार २३६ क्विंटल कापूस खरेदी झाली. यामध्ये भारतीय कापूस महामंडळातर्फे (सीसीआय) ४० हजार ३३३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. सीसीआयतर्फे प्रतिक्विंटल ५ हजार ३०० ते ५ हजार ३५० रुपये दर देण्यात आले. खासगी व्यापाऱ्यांकडून २८ हजार ९०३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. खुल्या बाजारात प्रतिक्विंटल ५ हजार ६०० ते ५ हजार ८०० रुपये दर मिळाले.  सध्या परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाच्या दरात सुधारणा झाली असून, प्रतिक्विंटलचे दर ६ हजार रुपयांपर्यंत पोचल्याने दर वाढतील, या अपेक्षेने कापूस घरात साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. जिल्हानिहाय कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

जिल्हा     कापूस खरेदी
नांदेड   ४७८८१३
परभणी ११०४४६६
हिंगोली ६९२३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com