agriculture news in marathi 1675 tons of fertilizer, 60 quintals of seeds , Home delivery in Aurangabad | Agrowon

औरंगाबादमध्ये १६७५ टन खते, ६० क्विंटल बियाण्यांचे घरपोच वाटप

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

औरंगाबाद : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात कृषी निविष्ठांसाठी होणारी गर्दी टळावी, यासाठी बांधावर कृषी निविष्ठा वाटप उपक्रमांतर्गत जिल्ह्यात १६७५.२० मेट्रिक टन खत व ६० क्विंटल बियाण्यांचे शेतकऱ्यांना घरपोच वाटप करण्यात आले’’, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली. 

औरंगाबाद : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात कृषी निविष्ठांसाठी होणारी गर्दी टळावी, यासाठी बांधावर कृषी निविष्ठा वाटप उपक्रमांतर्गत जिल्ह्यात १६७५.२० मेट्रिक टन खत व ६० क्विंटल बियाण्यांचे शेतकऱ्यांना घरपोच वाटप करण्यात आले’’, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली. 

या उपक्रमात एकूण १०६ शेतकरी गटातील १२०९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. आजपर्यंत एकूण १२ हजार ३६२.०७ मेट्रिक टन खत व २८२.१४ क्विंटल बियाण्यांचे शेतकऱ्यांना घरपोच वाटप करण्यात आले. ग्रामस्तरावर दुकानांची उपलब्धता लक्षात घेऊन गावनिहाय एक तसेच बाजारपेठेचे ठिकाण असल्यास व तेथून खतांची व बियाण्यांची विक्री होते. 

पर्यवेक्षक व विस्ताराधिकाऱ्यांकडे बाजारपेठेतील ज्या दुकानांवर मुख्यतः गर्दी होते त्याचे विश्लेषण करून त्यानुसार त्या दुकानांवर संनियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे आदेश काढावेत. या अधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांवर सावलीची व्यवस्था, बॅरिकेटींग व शारीरिक अंतराच्या अनुषंगाने कायम स्वरूपात व्यवस्था आदीची कृषी सेवा केंद्रात व्यवस्था असल्याची खातरजमा करावी, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत, असे जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी गंजेवार यांनी कळविले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...