यवतमाळ ः ‘रोहयो’ घोटाळ्यातील १७ आरोपी फरार

यवतमाळ ः ‘रोहयो’ घोटाळ्यातील १७ आरोपी फरार
यवतमाळ ः ‘रोहयो’ घोटाळ्यातील १७ आरोपी फरार

यवतमाळ ः पांढवरकवडा पंचायत समितीअंतर्गत रोजगार हमी योजनेत (रोहयो) एक कोटी ३२ लाख रुपयांचा गैरव्यवहार समोर आला होता. याप्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल होताच सर्व १७ आरोपी फरार झाले असून सात जणांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.  पांढरकवडा पंचायत समितीअंतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत १ कोटी ३२ लाख ३२४ रुपयांची अनियमितता समोर आली होती. याप्रकरणी गेल्या आठवड्यात शनिवारी (ता. १) पांढरकवडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पांढरकवडा पोलिसांनी तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांसह एकूण १७ जणांविरोधात गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल होताच सर्व आरोपी अटकेच्या भीतीने भूमिगत झाले आहेत. या १७ आरोपींपैकी वरिष्ठ सहायक पी. एन. थुटे, एम. ए. निमसेटकार, शाखा अभियंता रमेश कोरेटी, एस. व्ही. बोजेवार, गोपाल उमाटे, तांत्रिक सहायक सुबोध दुबे, डाटा एन्ट्री ऑपरेटर बादल खंडारे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.  ‘रोहयो’अंतर्गत कामे करताना प्रत्यक्ष कामापेक्षा जास्त नोंदी घेत व्हाउचर्स तयार करून अधिक र‍कमेची उचल करण्यात आली. पीटीओमार्फत जेवढे देयक सादर करण्यात आले, त्यानुसार ग्रामपंचायतीने पैशाची मागणी करून पैशाची उचल केली. याबाबतच्या तक्रारींची दखल घेत तत्कालीन उपविभागीय अधिकारी एस. भुवनेश्‍वरी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात जमादार वसंत चव्हाण, शिपाई शंकर पारेकर करीत आहेत.   काय आहे प्रकरण पांढरकवडा पंचायत समितीअंतर्गत असलेल्या पिंपरी, कोंढी, वांजरी, आकोली (बु), आकोली (खु), खैरगाव (बु.) या सहा ग्रामपंचायतींमध्ये सिमेंट नाली बांधकाम व सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींचे बांधकाम ‘रोहयो’तून करण्यात आले. परंतु, या कामात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या. चौकशी समितीने फेरमूल्यांकन केले असता एक कोटी ३० लाख २० हजर ३२४ रुपयांचा अपहार झाल्याची बाब समोर आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com