agriculture news in Marathi 17 crops included in cropsap Maharashtra | Agrowon

‘क्रॉपसॅप’ प्रकल्पात १७ पिकांचा समावेश 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

शेतकऱ्यांना या पिकांवरील कीड-रोगाच्या नियंत्रणावरील शास्त्रोक्त सल्ला देण्यासाठी यंदा २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 

पुणे ः राज्यात यंदा पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला (क्रॉपसॅप) प्रकल्पात १७ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या पिकांवरील कीड-रोगाच्या नियंत्रणावरील शास्त्रोक्त सल्ला देण्यासाठी यंदा २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 

‘क्रॉपसॅप’ प्रकल्पामुळे कापूस, सोयाबीन,भात, तूर, मका, ज्वारी, ऊस, हरभऱ्यावरील कीड-रोगाचे ३४ जिल्ह्यांत ९० उपविभागांत सर्वेक्षण होईल. आंबा, केळी, मोसंबी, संत्रा, चिकू, काजू ही फळपिके आणि भेंडी, टोमॅटो या दोन भाजीपाला पिकांचाही प्रकल्पात समावेश आहे. प्रकल्पातील गावे निवडण्याची जबाबदारी कृषी सहायकांकडे देण्यात आली आहे. 

राज्यात यापूर्वी कपाशीवरील गुलाबी बोंड अळी, उसावरील हुमणी, मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्या वेळी क्रॉपसॅपचा चांगला उपयोग या कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी झाला. या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यभर घेतल्या जात असलेल्या पीकनिहाय शेतीशाळांमधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित करता येते, असा दावा कृषी विभागाचा आहे. 

‘क्रॉपसॅप’ प्रकल्पावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. राज्यात एक जूनपासून कापूस, मका, सोयाबीन, भात, मका, ज्वारी, ऊस, तूर आणि हरभरा पिकांवरील कीड-रोग व्यवस्थापनाचे काम करण्यात आले आहे. कीडनियंत्रणासाठी या प्रकल्पातून उसासाठी ३० जूनपर्यंत, तुरीसाठी सप्टेंबरअखेरपर्यंत आणि हरभऱ्यासाठी नोव्हेंबरपर्यंत फेरोमेन सापळे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. 

ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान क्रॉपसॅप प्रकल्पातील समाविष्ट गावांमध्ये दोन बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी सल्ला देण्याकरिता कृषी विद्यापीठांकडून ऑनलाइन प्रशिक्षिण दिले जाईल. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात एका कृषी विज्ञान केंद्रांकडे जबाबदारी दिला जाणार आहे. कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाची प्रात्यक्षिके घेण्यासाठी जुलैत गावे आणि शेतकऱ्यांची निवड करण्याची जबाबदारी तालुका कृषी अधिकाऱ्यावर देण्यात आली आहे. 

कपाशीचा हंगाम डिसेंबरपर्यंतच 
राज्यात कपाशी बियाणे विक्रीची सुरुवात करण्यासाठी यंदा कालावधी निश्‍चित केला गेला होता. तसाच, काढणीसाठी देखील कालावधी ठरविण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी डिसेंबरपर्यंत कपाशी काढून हंगाम संपविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एक जानेवारीपासून कपाशी उत्पादक पट्ट्यात फरदड निर्मूलनाची मोहीम हाती घेतली जाईल. क्रॉपसॅप प्रकल्पाच्या अंमलबजावणीची दिशा ठरविणाऱ्या बैठका जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जुलैत होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 


इतर अॅग्रो विशेष
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...
‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली  : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...
महाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस !!!सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....
रत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...
‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...
मराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...
सोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...
राज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...
राज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...
लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...