agriculture news in Marathi 1.7 crore package for poor Maharashtra | Agrowon

गरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज: निर्मला सितारामन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर केंद्राने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर केंद्राने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात देशातील शेतकरी, मजूर, गरीब नागरिक आणि निराधार महिलांना दिलासा देण्यासाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी गुरुवारी (ता.२६) दिली. 

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पत्रकार परिषद घेत देशातील नागरिकांना दिलासा देण्यासाठीचे निर्णय जाहीर केले. ‘‘कोरोनाशी दोन करणाऱ्या सॅनिटेशन कामगार, डॉक्टर, नर्स, ‘आशा’ सेविका आणि पॅरामेडीक्स यांना प्रत्येकी ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. देशातील जवळपास ८० कोटी किंवा एक तृतीयांश जनतेला पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येक माणसासाठी पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. तसेच एक किलो दाळही मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे गरिबांचे हाल होणार नाहीत. त्यांना आवश्यक ते धान्य मिळेल. यापूर्वी पाच किलो धान्य देण्यात येत होते. आता आणखी पाच-पाच किलो गहू व तांदूळ देण्यात येणार आहे,’’ असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 

‘‘शेतकऱ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे. ‘पीएम-किसान’ योजनेचा ८ कोटी ६९ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मनरेगा योजनेत कामगारांच्या वेतनात १८२ रुपयांवरून २०२ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. प्रतिकामगार दोन हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या योजनेचा पाच कोटी कामगारांना लाभ होणार आहे,’’ अशी घोषणाही त्यांनी केली. 

महत्त्वाचे निर्णय... 

  • देशातील तीन कोटी ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी एक हजार रुपये देण्यात येणार आहे. 
  • जनधन खाते असलेल्या महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येक महिन्यात ५०० रुपये देण्यात येणार आहे. २० कोटी महिलांना मिळणार लाभ. 
  • महिला उज्वला योजनेंतर्गत तीन महिने मोफत सिलिंडर मिळणार. ८.३ कोटी कुटुंबांना होणार लाभ. 
  • दिन दयाल राष्ट्रीय जीवन मिशन अंतर्गत महिला बचत गटांना २० लाखांपर्यंत कर्जे मिळणार. ६३ लाख गटांतील ७ कोटी सदस्यांना मिळणार लाभ. 
  • १०० पर्यंत कामगार असलेल्या आणि त्यांपैकी ९० टक्के कामगारांचे वेतन प्रतिमहिना १५ हजार रुपये असलेल्या कंपन्या आणि कामगारांचे पीएफचा हप्ता तीन महिने सरकार भरणार. 
  • देशातील साडेतीन कोटी बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी जवळपास ३१ हजार कोटी असलेला कल्याण निधी वापरण्याचे राज्यांना निर्देश देण्यात आले. 

‘पीएम-किसान’चा हप्ता देणार 
‘‘लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार आहे. देशातील ८ कोटी ६९ लाख शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे,’’ अशी माहिती अर्थमंत्री सितारामन यांनी दिली. 
 


इतर अॅग्रो विशेष
यंदाची चैत्री वारी रद्द, पंढरपुरात येऊ...सोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची...
पुणे बाजार समितीत १७ हजार क्विंटल फळे...पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
जळगाव बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगकडे...जळगाव  ः येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...
देशात कोरोनाबाधीत १०७१ रुग्ण  नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीत रुग्णांची...
कोकण रेल्वेकडून अत्यावश्यक वस्तूंची जलद...रत्नागिरीः देशभरातील जनतेला आवश्यक वस्तूंचा...
सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले...पुणे: कोरोनामुळे राज्यात दुधाचा महापूर सुरू झाला...
बार्शी तालुक्यातील द्राक्षपट्टा...सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
पुणे विभागात ३२९ क्विंटल भाजीपाल्याची...पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शाळांमध्ये शिल्लक धान्यांचे ...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळांना...
कृषी पदव्युत्तर पदवी प्रवेशाच्या सामाईक...पुणे  : महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा...
शालेय विद्यार्थ्यांना मिळणार तांदूळ,...नगर ः शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील...
लॉकडाऊनमधून बियाणे उद्योग वगळलापुणे : शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा सुरळीत...
पुणे बाजार समितीत आज केवळ फळे, कांदा...पुणे: लॉकडाऊनमध्ये बाजार समित्यांमध्ये...
'कृषी'च्या सामाईक प्रवेश परिक्षेत...परभणी: महाराष्‍ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा...
संकटातही कंदरच्या शेतकऱ्यांकडून आखातात...पुणेः सोलापूर जिल्ह्यातील कंदर (ता. करमाळा) येथील...
मध्य महाराष्ट्र, विदर्भात वादळी पावसाचा...पुणे : राज्यात पुर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे...
माल वाहतुक करणाऱ्या वाहनांवरील टोल...मुंबई ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
स्पेनच्या राजकन्येचा कोरोनामुळे मृत्यू...माद्रीद : स्पेनच्या राजकन्या मारीया टेरेसा यांचा...
राज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची...मुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...