agriculture news in Marathi 1.7 crore package for poor Maharashtra | Agrowon

गरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज: निर्मला सितारामन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर केंद्राने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर केंद्राने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात देशातील शेतकरी, मजूर, गरीब नागरिक आणि निराधार महिलांना दिलासा देण्यासाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी गुरुवारी (ता.२६) दिली. 

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पत्रकार परिषद घेत देशातील नागरिकांना दिलासा देण्यासाठीचे निर्णय जाहीर केले. ‘‘कोरोनाशी दोन करणाऱ्या सॅनिटेशन कामगार, डॉक्टर, नर्स, ‘आशा’ सेविका आणि पॅरामेडीक्स यांना प्रत्येकी ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. देशातील जवळपास ८० कोटी किंवा एक तृतीयांश जनतेला पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येक माणसासाठी पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. तसेच एक किलो दाळही मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे गरिबांचे हाल होणार नाहीत. त्यांना आवश्यक ते धान्य मिळेल. यापूर्वी पाच किलो धान्य देण्यात येत होते. आता आणखी पाच-पाच किलो गहू व तांदूळ देण्यात येणार आहे,’’ असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 

‘‘शेतकऱ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे. ‘पीएम-किसान’ योजनेचा ८ कोटी ६९ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मनरेगा योजनेत कामगारांच्या वेतनात १८२ रुपयांवरून २०२ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. प्रतिकामगार दोन हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या योजनेचा पाच कोटी कामगारांना लाभ होणार आहे,’’ अशी घोषणाही त्यांनी केली. 

महत्त्वाचे निर्णय... 

  • देशातील तीन कोटी ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी एक हजार रुपये देण्यात येणार आहे. 
  • जनधन खाते असलेल्या महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येक महिन्यात ५०० रुपये देण्यात येणार आहे. २० कोटी महिलांना मिळणार लाभ. 
  • महिला उज्वला योजनेंतर्गत तीन महिने मोफत सिलिंडर मिळणार. ८.३ कोटी कुटुंबांना होणार लाभ. 
  • दिन दयाल राष्ट्रीय जीवन मिशन अंतर्गत महिला बचत गटांना २० लाखांपर्यंत कर्जे मिळणार. ६३ लाख गटांतील ७ कोटी सदस्यांना मिळणार लाभ. 
  • १०० पर्यंत कामगार असलेल्या आणि त्यांपैकी ९० टक्के कामगारांचे वेतन प्रतिमहिना १५ हजार रुपये असलेल्या कंपन्या आणि कामगारांचे पीएफचा हप्ता तीन महिने सरकार भरणार. 
  • देशातील साडेतीन कोटी बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी जवळपास ३१ हजार कोटी असलेला कल्याण निधी वापरण्याचे राज्यांना निर्देश देण्यात आले. 

‘पीएम-किसान’चा हप्ता देणार 
‘‘लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार आहे. देशातील ८ कोटी ६९ लाख शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे,’’ अशी माहिती अर्थमंत्री सितारामन यांनी दिली. 
 


इतर बातम्या
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र...पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा...जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक...
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे...नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी...
वाशीममधील कृषी निविष्ठा केंद्रे सुरू...वाशीम : ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक...पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...