agriculture news in Marathi 17 crore pending of paddy bonus Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांचे धान बोनसचे १७ कोटी रुपये थकले 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 जून 2021

गेल्या खरीप हंगामात विक्री केलेल्या धानाचे बोनस न मिळाल्याने ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.

चंद्रपूर : गेल्या खरीप हंगामात विक्री केलेल्या धानाचे बोनस न मिळाल्याने ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील तब्बल नऊ हजार ५१२ शेतकऱ्यांचे बोनस थकीत असून ते त्वरित वितरित करावी, अशी मागणी आहे. 

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी आदिवासी विकास महामंडळाने प्राधिकृत केलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांना धान्य विक्री करीत आहेत. पणन महासंघाकडून देखील धान खरेदी केंद्रे सुरू केली जातात. या केंद्रांवर देखील धानाची विक्री होते. चिमूर प्रकल्पात यावर्षी २९ आदिवासी सोसायट्यांमार्फत ९५१२ शेतकऱ्यांकडून दोन लाख ५३ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. या शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे चुकारे अदा करण्यात आले. मात्र १७ कोटी ७२ लाख ३५९ रुपयांचा बोनस थकीत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असलेली बोनसची रक्कम मिळावी याकरिता शेतकरी अनेक पातळ्यांवर पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांना यश आले नाही. 

चिमूर आदिवासी प्रकल्पात नागभिड, चिमूर, सिंदेवाही, भद्रावती, वरोरा या तालुक्याचा समावेश होतो. मात्र नागभीड, सिंदेवाही व चिमूर या तालुक्यातच धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. त्यानंतर शेतकरी धान विक्रीला आणतात. शासनाने आदिवासी दोन वर्षांपूर्वी विविध कार्यकारी सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले. सोसायट्यांकडून १८३५ रुपये हमी भाव आणि सातशे रुपये बोनस याप्रमाणे खरेदी करण्यात आली. खरेदीची रक्कम मिळाली असली तरी बोनसची प्रतीक्षा मात्र शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांना बोनस मिळावी याकरिता प्रशासकीय पातळीवर याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आदिवासी विकास प्रकल्प विभागाकडून देण्यात आली. 


इतर अॅग्रो विशेष
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
सोयाबीनने गाठला दहा हजारांचा ऐतिहासिक...अकोला/लातूर ः गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर...
विदर्भात कृषी अधिकाऱ्यांनीच घेतले विमा...नागपूर ः जिल्हास्तरावर आमचे कार्यालय आहे, हे...
मराठवाड्यात पीकविम्याबाबत शेतकऱ्यांसमोर...औरंगाबाद : पीकविमा उतरविण्याची सोय त्यासाठी जागर...
खानदेशात पीकविमा कंपनीचे कार्यालयच नाही जळगाव : खानदेशात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
केव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या...मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (...
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...