पुणे विभागात आडसाली उसाच्या १७ टक्के लागवडी

यंदा एक जून रोजी दाखल झालेल्या पावसामुळे ऊस लागवडी वेळेवर सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उसाच्या लवकर लागवडी सुरू केल्या आहेत. पुणे विभागात १६ ऑगस्ट अखेरपर्यंत आडसाली उसाच्या ६४ हजार ६५१ हेक्टर म्हणजेच १७ टक्के क्षेत्रावर लागवडी झाल्या आहेत.
17% cultivation of Adsali sugarcane in Pune division
17% cultivation of Adsali sugarcane in Pune division

पुणे ः यंदा एक जून रोजी दाखल झालेल्या पावसामुळे ऊस लागवडी वेळेवर सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उसाच्या लवकर लागवडी सुरू केल्या आहेत. पुणे विभागात १६ ऑगस्ट अखेरपर्यंत आडसाली उसाच्या ६४ हजार ६५१ हेक्टर म्हणजेच १७ टक्के क्षेत्रावर लागवडी झाल्या आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी उसाच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. येत्या काळात पाऊस झाल्यास लागवडीच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता असून पुढील वर्षी गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होऊ शकतो.

चांगल्या पावसामुळे पुणे विभागातील मुळा, भंडारदरा, कुकडी, उजनी, जायकवाडी, खडकवासला, पानशेत अशी जवळपास सर्वच धरणे भरली आहेत. काही धरणांत पाण्याची चांगली उपलब्धता झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी ऊस पिकांकडे वळू लागले आहेत. इतर पिकांच्या तुलनेत ऊस पिकाकडे शाश्वत उत्पन्न म्हणून शेतकरी पाहतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी दरवर्षी आडसाली उसाच्या लागवडी करतात.

यंदा कोरोनामुळे भाजीपाला व इतर पिकांचे दर घसरून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे चित्र आहे. जून, जुलै महिन्यांत पावसाचा थोड्याफार प्रमाणात खंड पडला असला तरी अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस पडला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीवर भर दिला. परिणामी ऊस लागवडीच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत अडीच हजार हेक्टरने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ६२ हजार १४ हेक्टरवर लागवडी झाल्या होत्या. मात्र, यंदा ऑगस्टमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी लागवडीकडे वळाला आहे.

दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्व हंगामी, सुरू अशा तीन हंगामात उसाच्या लागवडी करतात. जून ते जुलै महिन्यात आडसाली उसाच्या शेतकरी प्रामुख्याने लागवडी करतात. लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यांनी ऊस साखर कारखान्यास तोडणीस देतात.

जिल्हानिहाय आडसाली ऊस लागवडी (हेक्टरमध्ये)
जिल्हा सरासरी क्षेत्र लागवड टक्के
नगर १,०२,६१३ ३१,२८३ ३०
पुणे १,३०,६३१ १४,०१६ १०
सोलापूर १,३७,५३६ १९,३५२ १४
एकूण ३,७०,७८१ ६४,६५१ १७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com