कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
ताज्या घडामोडी
खानदेशात १७ लाख टन ऊसगाळप
खानदेशात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. ऊस गाळपासंबंधीची कार्यवाही वेगात सुरू असून, एकूण १७ लाख टनांवर गाळप पूर्ण झाले आहे.
जळगाव : खानदेशात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. ऊस गाळपासंबंधीची कार्यवाही वेगात सुरू असून, एकूण १७ लाख टनांवर गाळप पूर्ण झाले आहे.
गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे. या पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नजीकचा मुक्ताई साखर कारखाना क्रमांक दोनवर आहे. नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यात तळोदा येथील श्रीकृष्ण, डोकारे (ता. नवापूर) येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना, समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील आयान कारखाना आणि पुरुषोत्तमनगर येथील सातपुडा कारखान्याचा समावेश आहे.
समशेरपूर येथील कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन आठ हजार टनांवर आहे. इतर कारखान्यांची गाळप क्षमता अडीच ते चार हजार टन प्रतिदिन एवढी आहे. परंतु मध्यंतरी बेमोसमी पाऊस, ग्रामपंचायतीच्या निवडणुका यामुळे गाळपाला फटका बसला. आयान कारखाना उशिरा सुरू झाल्याने हा कारखाना गाळपात पुढे राहू शकला नाही. जळगाव जिल्ह्यात फक्त एकच साखर कारखाना सुरू आहे. तर न्हावी (ता. यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखाना आणि चहार्डी (ता. चोपडा) येथील चोपडा सहकारी साखर कारखाना बंद आहेत.
चोपडा येथील कारखाना दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात औरंगाबाद, नगर, नाशिक जिल्ह्यातील कारखाने उसाची खरेदी करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात सर्वांधिक चार हजार हेक्टर क्षेत्रात चाळीसगाव तालुक्यात ऊस लागवड झाली आहे. या तालुक्यात नगर, नाशिक व औरंगाबादमधील कारखाने उसाची खरेदी करीत आहेत. धुळे जिल्ह्यातही नाशिक, औरंगाबादमधील कारखाने उसाची खरेदी करीत आहेत. धुळ्यातील शिरपूर तालुक्यात ८०० टन गाळप क्षमतेचे गुऱ्हाळ सुरू आहे.
- 1 of 1098
- ››