मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
पुणे जिल्हा परिषदेचे १७ शिक्षक कोरोनाबाधित
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी पुणे जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. यामध्ये २१ नोव्हेंबर अखेर झालेल्या तपासणीमध्ये १७ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागण झाल्याने समोर आले आहे.
पुणे - राज्यात शाळा सुरू करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयानंतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी पुणे जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. यामध्ये २१ नोव्हेंबर अखेर झालेल्या तपासणीमध्ये १७ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागण झाल्याने समोर आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्याबाबत अद्यापही संभ्रम असून, अनेकांच्या तपासण्या अद्याप झालेल्या नसल्याचे देखील समोर आले आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने २० हजार २४४ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. २१ नोव्हेंबर पर्यंत झालेल्या ५ हजार ६७१ जणांच्या तपासणीतून १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे संबधितांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांना आणि नागरिकांना विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षकच कोरोनाबाधित झाल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यात धजावत नसल्याचे वातावरण आहे. यामुळे बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याचे आजचे चित्र होते.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात थंडी वाढू लागल्याने सर्दी खोकल्याचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नसल्याचे चित्र आहे.
- 1 of 1022
- ››