agriculture news in Marathi 17 thousand quintal arrival in pune APMC Maharashtra | Agrowon

पुणे बाजार समितीत १७ हजार क्विंटल फळे आणि कांदा बटाटा आवक 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये शहरातील फळे आणि कांदा बटाट्याची टंचाई जाणवू नये यासाठी पुणे बाजार समितीच्या प्रयत्नांना दुसऱ्या दिवशीही यश आले.

पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये शहरातील फळे आणि कांदा बटाट्याची टंचाई जाणवू नये यासाठी पुणे बाजार समितीच्या प्रयत्नांना दुसऱ्या दिवशीही यश आले. सोमवारी (ता.३०) फळे आणि कांदा बटाटा विभागात २८३ वाहनांमधून तर उपबाजारात ३०५ अशा ५८८ वाहनांमधून १७ हजार क्विंटल आवक झाली होती. यावेळी बाजारात व्यवहार संथ पण सुरळीत झाले. 

याबाबत बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख म्हणाले, कि आपत्कालीन आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये बाजार सुरु ठेवण्याच्या नियोजनानुसार सोमवारी (ता.३०) भाजीपाला विभाग बंद ठेवून कांदा बटाटा आणि फळांचा विभाग सुरु ठेवला होता. या नियोजनानुसार १६३ लहान मोठ्या वाहनांमधून फळांची तर १२० वाहनांमधून कांदा बटाट्याची आवक झाली होती. यावेळी बाजार संथ पण सुरळीत सुरु होता.

फळ विभागात प्रामुख्याने संत्री, कलिंगड, खरबुजाची मोठी आवक झाली होती. तर सर्वच शेतमालाचे दर स्थिर होते. आवकेमुळे शहरात आता फळांची देखील मुबलक उपलब्धता होत असून, कृत्रिम भाववाढ रोखण्यास मदत होत आहे. त्यामुळे ग्राहकांनी चढ्या दराने खरेदी करु नये तर विक्रेत्यांनी चढ्या दराने विक्री करु नये, तसे केल्याचे निदर्शनास आल्यास पोलीस प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पणन संचालक सुनील पवार यांनी बाजार आवाराला भेट देऊन समितीने करण्यात आलेल्या उपाययोजना आणि व्यवस्थापनाची माहिती देत, अहवाल शासनाला सादर केला आहे. 

फुल बाजार १५ एप्रिल पर्यंत बंदच 
कोरोना विषाणूचा वाढता फैलाव आणि बाजार समितीमधील फुल विभागाची मर्यादित जागा आहे. यामुळे गर्दी नियंत्रित करणे शक्य नसल्याने, कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी खबरदारी म्हणून 


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...