भंडारा : धानाचे १७० कोटींचे चुकारे थकीत 

आधारभूत किमती प्रमाणे सातशे कोटी ७४ लाख दहा हजार ३५५ रुपये धानाची किंमत आहे. यातील तब्बल १७० कोटी ८० लाख २६ हजार २२२ रुपयाचे चुकारे थकीत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
170 crores of grains are exhausted
170 crores of grains are exhausted

भंडारा : खरीप हंगामात पणन महासंघाने ३७ लाख ५१ हजार २९० घराची खरेदी केली आधारभूत किमती प्रमाणे सातशे कोटी ७४ लाख दहा हजार ३५५ रुपये धानाची किंमत आहे. यातील तब्बल १७० कोटी ८० लाख २६ हजार २२२ रुपयाचे चुकारे थकीत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. 

धान्याचे कोठार अशी भंडारा जिल्ह्याची ओळख. या जिल्ह्यात पणन महासंघाकडून हमीभावाने खरेदी होते. १८३५ रुपये हमीभाव, पाचशे रुपये बोनस व दोनशे रुपये सानुग्रह अनुदान धानाला जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे पणन महासंघाच्या केंद्रांवर आवक वाढली. हंगामात तब्बल ३७ लाख ५१ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेला हा धान्य गोदामात ठेवला जातो. तिथून तो भरडाईसाठी पाठवला जातो.  या वर्षी मात्र भरडाईच्या दरावरून मिलर्स आणि शासन यांच्यात वाद निर्माण झाला. परिणामी, भरडाईसाठी धानाची उचलच करण्यात आली नाही. त्यामुळे खरेदी केलेल्या एकूण ३७ लाख ५१ हजार २९० क्विंटल धानापैकी केवळ एक लाख पंचवीस हजार क्विंटल धानाची भरडाई आजवर होऊ शकली. तब्बल ३६ लाख क्विंटल धान अद्यापही भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. 

भंडारा जिल्ह्यात २०३ मी लसूण त्यापैकी दीडशे मिलर्संना भरडाईसाठी कंत्राट देण्यात आले आहे. मात्र त्यांनी अद्यापही धानाची उचल केली नाही. जिल्ह्यातील २५० गोदाम धानाने भरले असून, अर्धेअधिक धान उघड्यावर आहे. माॅन्सूनपूर्व पावसाचे आगमन सर्वदूर झाले आहे. त्यामुळे उघड्यावरील हा धान पावसामुळे भिजत खराब होण्याची भीती वर्तवली जात आहे. धान भिजू नये याकरिता त्यावर ताडपत्रीचे संरक्षण दिले आहे. मात्र ती व्यवस्था पुरेशी नसल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे खरीप हंगामातील धानाची भरडाई रखडल्याने गोदामात जागा नाही. परिणामी, उन्हाळी धान खरेदीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com